काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.हर्षवर्धन सकपाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टीपू सुल्तान हे समकक्षच आहेत असे विधान केल्यानंतर त्यांच्यावर राज्य सरकारने जोरदार टीका केली होती. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पुणे येथील पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर कार्यालयात टिपू सुलतान यांचा फोटो लावल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर शान ए हिंद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतान यांची तसबीर लावली आहे. या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपा आणि शिंदे शिवसेनेने तीव्र आक्षेप घेतला होता.
देवेंद्र फडणवीस यांची जोरदार टीकायानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेस लांगुनचालनासाठी काहीही करु शकते.खरं म्हणजे हर्षवर्धन सपकाळ यांना लाज वाटली पाहिजे. त्यांनी टिपू सुलतान यासारख्या नराधमाची तुलना शिवाजी महाराजांशी करणे अतिशय निंदनीय आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य तयार केले. मोगलांच्या जोखडातून सामान्य माणसाला मुक्त करण्याचे काम केले. खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य तयार केले. त्याच वेळी हजारो-लाखो हिंदूंची टिपू सुलतान याने हत्या केली होती.
टिपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणे, दोघांनाही समकक्ष मानणे यापेक्षा जास्त लांगूलचालन मी या जन्मात पाहिले नाही,” अशी जोरदार टीका फडणवीस यांनी केली. तसेच सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. टिपू सुलतान यांची छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केल्याने भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पर्वती पोलीस ठाण्यात हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आता
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.