ठाणे, ता. १४ : डोकेदुखी आणि दृष्टी कमी होणे ही लक्षणे अनेकदा किरकोळ समजून दुर्लक्षित केली जातात. मात्र, हीच लक्षणे ब्रेन ट्यूमरची असू शकतात, असा इशारा ठाणे येथील सोलारिस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या तज्ज्ञांनी दिला आहे. अत्याधुनिक न्यूरो-नॅव्हिगेशन तंत्रज्ञानाच्या साह्याने करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेमुळे उल्हासनगरमधील दोन रुग्णांना नवजीवन मिळाले आहे.
सोलारिस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे उल्हासनगर येथे न्यूरोलॉजी आणि मणक्याच्या समस्यांसाठी रविवारी (ता. २२) मोफत वैद्यकीय शिबिर घेण्यात येणार आहे. हे शिबिर सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत इंडियन रेड क्रॉस सोसायटी, रेड क्रॉस भवन, सेंट्रल हॉस्पिटलसमोर, उल्हासनगर येथे होणार आहे. मेंदू व मणक्याच्या गाठी, जुनाट डोकेदुखी, फेफरे, चक्कर, न्यूरोपॅथी, संतुलन विकार, मायस्थेनिया ग्रेव्हिस आदी समस्यांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. अनुसया चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंडियन रेड क्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर होणार असून अधिक माहितीसाठी पुष्कला एस. ९८२१५२९६५३ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.