आळेफाटा, ता. १४ ः राजुरी (ता. जुन्नर) येथील सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन २०२६ उत्साहात झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन आकाश डावखरे, आळेफाटा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, संस्थेचे खजिनदार सचिन चव्हाण, प्राचार्य पी. बालारामडू, सुप्रिया औटी आदींच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विविध समाजप्रबोधनपर गीत, पोतराज गीत, नृत्य, भारतीय एकात्मतेचे दर्शन या विविध कलाप्रकारांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. शेवटी झालेल्या कलाविष्काराने सर्वांची मने जिंकली. या स्नेहसंमेलनाची सुरुवात गणेश वंदनेने आणि स्वागत गीताने करण्यात आली. तर शेवट राष्ट्र गीताने करण्यात आला. लहान मुलांचे सादरीकरण पाहून पालक तसेच आलेले प्रमुख पाहुणे यांनी उत्स्फूर्त दाद दिली. बाल गोपाल विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.