नाशिक: बारावीच्या परीक्षेला इंग्रजीच्या पेपरने मंगळवारी (ता. १०) सुरुवात झाली. नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यात पाचोरा येथे कॉपीची चार प्रकरणे आढळली असून, उर्वरित जिल्ह्यांमध्ये शिक्षण मंडळाला कुठलाही गैरप्रकार आढळून आला नाही. पहिलाच पेपर असल्याने विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक असताना, पेपर सोपा गेल्याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
नियोजित वेळापत्रकानुसार मंगळवारपासून बारावीच्या लेखी परीक्षेला सुरुवात झाली. पहिलाच पेपर असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहासोबत काहीशी घालमेल बघायला मिळाली. शिक्षण मंडळाने केलेल्या सूचनांनुसार विद्यार्थी निर्धारित वेळेत परीक्षा केंद्रांवर उपस्थित होते. बहुतांश विद्यार्थ्यांना केंद्रापर्यंत त्यांच्या पालकांनी सोडले. यामुळे परीक्षा केंद्रांबाहेर मोठी गर्दी झाली होती. शिक्षण मंडळाच्या सूचनांनुसार परीक्षा केंद्रांवर संपूर्ण सज्जता ठेवलेली होती.
तसेच सीसीटीव्ही व इतर उपाययोजनादेखील केलेल्या होत्या. सकाळी अकराला पेपर सुरू झाला. बहुतांश विद्यार्थ्यांना पहिलाच इंग्रजीचा पेपर सोपा गेल्याने त्यांचा आत्मविश्वास बळावला होता. यामुळे परीक्षा संपल्यावर केंद्राबाहेर पडताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमलले होते. नाशिक विभागात केवळ जळगाव जिल्ह्यात पाचोरा येथील केंद्रावर चार कॉपीबहाद्दर आढळून आले असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या वेळापत्रकानुसार बुधवारी (ता. ११) हिंदीसह इतर परदेशी भाषांचा पेपर होणार आहे.
Bhushan Gavai : 'या' स्वातंत्र्यवीराच्या नावे दिला जाणारा सामाजिक पुरस्कार Supreme Court चे निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांना जाहीरपरीक्षा केंद्राबाहेरची क्षणचित्रे
केंद्राच्या आवारातील फोटोकॉपी (झेरॉक्स) दुकाने ठेवली बंद
पोलिसांसह गृहरक्षक दल जवानांचा होता बंदोबस्त
अनेक पालकांनी परीक्षा कालावधीत मांडले ठाण
शेवटच्या मिनिटापर्यंत प्रश्न सोडविण्यात विद्यार्थी दंग
व्याकरण, उताऱ्याचे प्रश्न सोडविताना लागला सर्वाधिक वेळ
परीक्षेनंतर विद्यार्थी समूह रंगले होते गप्पांमध्ये
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.