Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील सगळ्यांची लाडकी मालिका लग्नानंतर होईलच प्रेम सध्या चर्चेत आहे. मालिकेत सध्या अनेक चांगले ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. त्यातच नव्या प्रोमोने प्रेक्षकांना सुखद धक्का बसला आहे.
पार्थ आणि काव्याने अखेर एकमेकांना स्वीकारलं आहे. पार्थने काव्याजवळ त्याच्या प्रेमाची कबुली दिली. तर नंदिनी आणि जीवामधील दुरावाही लवकरच दूर होईल. त्यातच नव्या प्रोमोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
प्रोमोमध्ये पाहायला मिळालं की, काव्या-पार्थ आणि जीवा-नंदिनी यांच्या कांदेपोह्याचा कार्यक्रम थाटात पार पडतोय. पार्थचे वडील मुलीला काही व्यसन वगैरे असं विचारतात त्यावर पार्थ बाकी काही व्यसन नाही फक्त माझ्यावर फिस्कारण्याचं व्यसन आहे असं म्हणतो. त्यानंतर पार्थ आणि काव्याचे वडील एकमेकांना मिठी मारतात. लवकरच या चौघांचा लग्न होईल असं जाहीर करतात.
View this post on Instagram
A post shared by मराठी Television Information (@marathitvinfo_official)
प्रोमो पाहून प्रेक्षक खुश झाले. "अरे वा वा माझी wish पूर्ण केली... ", "आता मजा येणार","नवीन एपिसोड बघण्यासाठी उत्सुक" अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत.
पार्थ आणि काव्याचा लग्नसोहळा थाटात पार पडणार का ? जीवा-नंदिनीला कसं मनवणार ? या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम दररोज संध्याकाळी 7 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
"मरणाच्या दारात असताना त्यांनी मला इंजेक्शन दिलं" दिव्या शिंदेचे बिग बॉस टीमवर गंभीर आरोप; म्हणाली..Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.