कोल्हापूर : मोकाट जनावरांमुळे महामार्गावर होणाऱ्या अपघातांची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा रस्ता सुरक्षा समितीला उपाययोजना करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्य सरकारने समितीने विशेष मोहीम घेऊन महामार्गांवरील धोकादायक भागांची निश्चिती करावी, गस्ती पथकांद्वारे वारंवार पाहणी करून मोकाट जनावरांना ताब्यात घेऊन त्यांना तातडीने निवारा केंद्रात स्थलांतरित करावे, असे निर्देश दिले आहेत. पुढील आठवड्यात याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन कार्यवाहीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
शहरातील रस्त्यांसह विविध महामार्गांवर मोकाट जनावरांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने स्वत: यात लक्ष घालून राज्य सरकारला उपाययोजनांबाबत आदेश दिले आहेत.
Kolhapur Traffic : कोल्हापुरात ट्रॅफिकचा स्फोट! ‘मास्टर प्लॅन’ कागदावरच राहणार का, की महापालिका घेणार ठोस निर्णय?त्यानुसार राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शासन निर्णयही काढला आहे. यामध्ये जिल्हा रस्ता सुरक्षा समितीमार्फत नगरपालिका प्राधिकरणे, रस्ते व परिवहन विभाग, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांनी संयुक्त विशेष मोहीम राबवून महामार्गावरील धोकादायक संवेदनशील भागांची निश्चिती करावी, तसेच या भागातः आढळणारी भटकी जनावरे हटवून त्यांना निश्चित केलेल्या निवारा केंद्रात स्थलांतरित करावे, रस्ता सुरक्षा समितीतर्फे गस्ती पथके स्थापन करून ती संबंधित स्थानिक पोलिस ठाणे, पशुसंवर्धन अधिकारी आणि नगरपालिका, पंचायत राज प्राधिकरणे यांच्या समन्वयाने चोवीस तास कार्यरत ठेवून त्यांच्यामार्फत वारंवार पाहणी करावी, असे निर्देश दिले आहेत.
या पार्श्र्वभूमीवर जिल्हा सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत या आदेशाच्या अंमलबजावणीची चर्चा होणार आहे. मोकाट जनावरांमुळे शहरातील मार्गांसह महामार्गांवर ही छोटेमोठे अपघात होत असतात. यामध्ये गंभीर दुखापतीसह अनेकांना जीवीताला ही धोका निर्माण होत असतो. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्वत: यामध्ये लक्ष घालून कारवाईचे दिलेले आदेश योग्य आहेत. त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होण्याची गरज आहे.
Pune Traffic : जेधे चौकात जीव धोक्यात! अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालकांमुळे पादचाऱ्यांची रोजची कसरत सर्व महामार्गांवर ‘हेल्पलाईन’ क्रमांक ठळकपणे लावणारभारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या १०३३ व राज्य सरकारच्या ११२ या ‘हेल्पलाईन’ क्रमांकाची जिल्हा रस्ता सुरक्षा समितीमार्फत जनजागृती व प्रसिद्धी करावी. तसेच हे क्रमांक सर्व राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, राष्ट्रीय द्रुतगती मार्गांवर जोखीम क्षेत्रांनुसार आवश्यकतेनुसार ठरावीक अंतरावर ठळकपणे दर्शवावेत, असे निर्देश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने मोकाट जनावरांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात पत्राद्वारे कळविले आहे. त्यानुसार पुढील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या जिल्हा सुरक्षा समितीच्या बैठकी चर्चा होईल. त्यानंतर कोणत्या उपाययोजना करायच्या हे ठरवून त्यानुसार कार्यवाही केली जाईल.
- चंद्रकांत आयरेकर, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोल्हापूर
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.