टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या हायव्होल्टेज सामन्यात भारत पाकिस्तान हे संघ आमनेसामने आले आहेत. नाणेफेकीचा कौल गमावल्याने भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. भारताने या सामन्यात 20 षटकांचा सामना केला आणि 7 विकेट गमवून 175 धावा केल्या. तसेच पाकिस्तानसमोर विजयासाठी 176 धावांचं आव्हान ठेवलं आहे. खरं तर भारताच्या 200 पार धावा व्हायला हव्या होत्या. पण तसं काही झालं नाही. भारताने 175 धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात भारताची सुरूवात काही चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात अभिषेक शर्माची विकेट गेली. त्याला खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे भारतावर दडपण वाढलं होतं. खरं तर या स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला आहे. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींची निराशा केली. इतकंच टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माही आवाक् झाला. त्याला अभिषेक शर्माकडून अशी अपेक्षा नव्हती.


भारत पाकिस्तान सामना सुरू होण्यापूर्वी रोहित शर्माने टीम इंडियाच्या डगआऊट आणि ड्रेसिंग रूमध्ये एन्ट्री मारली होती. तसेच खेळाडूंचं मनोबल वाढवलं होतं. रोहित शर्मा या स्पर्धेचा ब्रँड एम्बेसडर आहे. त्यामुळे खेळाडूंची भेट घेण्यासाठी गेला होता. यावेळी त्यांनी खेळाडूंची गळाभेट घेतली. तसेच चर्चाही केली. यावेळी खेळाडूंच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. पण सामना सुरू झाल्यानंतर त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. कारण पहिल्याच षटकात भारताने अभिषेक शर्माची विकेट गमावली. अभिषेक शर्माला खातंही खोलता आलं नाही. रोहित शर्मा त्यानंतर निराश झाला. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव फोटोच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.



रोहित शर्मा या स्पर्धेला ब्रँड एम्बेसडर म्हणून प्रमोट करत आहे. असं असलं तर टीम इंडिया बाबतच्या भावना या इतर क्रीडाप्रेमींसारख्याच आहेत. हा सामना भारतीयांच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे याची कल्पना माजी कर्णधार रोहित शर्माला आहे. त्यामुळे असं काही घडलं तर निराशा पडणं सहाजिकच आहे. आता भारतीय संघ विजयासाठी दिलेल्या धावा रोखते की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.