पुणे : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात भाजपच्या वतीने काँग्रेस भवनासमोर रविवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी झालेल्या दगडफेकीनंतर पोलिसांकडून भाजप आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांविरुध्द रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या संदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली.

BJP Woman Worker Assault : भाजपच्या महिला कार्यकर्त्याला विवस्त्र करुन मारहाण केल्याचा आरोप, पोलीस आयुक्तांनी सांगितलं नेमकं काय घडलं ?

काँग्रेस भवन परिसरात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या दगडफेकीत काँग्रेसचे तीन, भाजपच्या दोन कार्यकर्त्यांसह दोन पोलिस आणि दोन पत्रकार किरकोळ जखमी झाले. या घटनेवरून भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आरोप-प्रत्यारोप केले.


या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या. त्यानंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला. या प्रकरणी भाजप आणि काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.