पुणे : खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराकडून तीन पिस्तुलासंह १२ जिवंत काडतुसे जप्त केली. शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहिमेदरम्यान शाखेच्या युनिट-तीनच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे संभाव्य मोठा गुन्हा टळल्याचे मानले जात आहे.


सागर दत्तात्रेय सोनलकर (वय २५, रा. धायरी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Pune Crime News : विश्रांतवाडीतील कंपनीतून ६३ हजारांची रोकड लंपास

गुन्हे शाखेच्या युनिट-तीनचे साहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, साहाय्यक उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे आणि पथकातील पोलिस अंमलदार किशोर शिंदे, योगेश झेंडे हे १८ फेब्रुवारी रोजी सिंहगड रस्ता आणि नांदेड सिटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर होते. त्या वेळी सोनलकर हा प्रयेजा सिटी, वडगाव बुद्रूक परिसरात आल्याची माहिती मिळाली. त्याची खातरजमा करून पोलिसांनी सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान त्याच्याकडून तीन गावठी पिस्तूल आणि १२ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. आरोपीला नांदेड सिटी पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.


पोलिस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्या सूचनेनुसार पथकातील मारुती पारधी, नितीन जगदाळे, कैलास लिम्हण, तुषार किंद्रे, पुरुषोत्तम गुन्ला आदींनी कारवाईत सहभाग घेतला.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.