आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना हा शुक्रवारी 20 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात बी ग्रुपमधील ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना आहे. दोन्ही संघांचं साखळी फेरीतच पॅकअप झालंय. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि ओमान मोहिमेचा शेवट विजयाने करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ऑस्ट्रेलिया साखळी फेरीत झिंबाब्वेकडून उलटफेरची शिकार झालीय. तसेच त्यांचं आव्हानही संपु्ष्टात आलंय. तसेच ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख खेळाडूंना दुखापतीमुळे या स्पर्धेत सहभागी होता आलं नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या विश्वास कमी झाला आहे. त्यामुळे ओमान जाता जाता कांगारुंचा कार्यक्रम करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निमित्ताने उभयसंघातील हा सामना कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान सामना केव्हा?ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान सामना शुक्रवारी 20 फेब्रुवारीला होणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान सामना कुठे?ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान सामना पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान सामना मोबाईलवर लाईव्ह कुठे पाहता येणार?ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान सामना मोबाईलवर जियोहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.