Shamar Joseph Becomes First Player In Cricket's 55-Year History : वेस्ट इंडिज संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आपली अपराजित मालिका कायम राखताना इटलीवर ४२ धावांनी विजय मिळवला. सलग चौथ्या विजयासह वेस्ट इंडिजचा संघ क गटातून अव्वल स्थानासह सुपर ८मध्ये पोहोचला आहे. वेस्ट इंडिजच्या ६ बाद १६५ धावांचा पाठलाग करताना इटलीचा संपूर्ण संघ १८ षटकांत १२३ धावांत तंबूत परतला. या सामन्यात शे होपच्या वादळी खेळीने मैदाना गाजवले, परंतु शेमार जोफेफने वर्ल्ड रेकॉर्ड केला.
कर्णधार शे होपच्या ४६ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ७५ धावांच्या खेळीने विंडीजला सावरले. रोस्टन चेस ( २४) व शेरफाने रुथरफोर्ड ( २४) यांच्यासह मॅथ्या फोर्ड ( १६) यांनी धावसंख्येत हातभार लावला. इटलीकडून बेन मॅनेटी व क्रिशन कलुगामागे यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर अली हसन व थॉमस ड्रॅका यांनी प्रत्येकी १ बळी टिपला.
T20 World Cup Prize Money : १२ संघ वर्ल्ड कपमधून बाहेर पडले! पण, प्रत्येकाने कोट्यवधी रुपये कमावले; ऑस्ट्रेलियाच्या वाट्याला...लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इटलीच्या फलंदाजांना विंडीज गोलंदाजांसमोर टिकता आले नाही. बेन मॅनेटीने सर्वाधिक २६ धावा केल्या, तर जेजे स्मट्सने २४ धावा केल्या. अली हसनने अटलीकडून ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक ३ 'डक' चा नकोसा विक्रम नावावर केला. विंडीजच्या शेमार जोसेफने ४ षटकांत ३० धावा देताना ४ विकेट्स घेतल्या, तर मॅथ्यू फोर्डने ३ बळी टिपले. गुदाकेश मोतीला २ बळी मिळाले. पण, या सामन्यात जोसेफने अनोका वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला.
Shamar Joseph Creates Historyशेमार जोसेफने चार विकेट्ससह या सामन्यात चार झेलही टिपले. पुरूष किंवा महिलांच्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेट सामन्यात चार विकेट्स व चार झेल घेणारा तो पहिला खेळाडू ठरला. विशेष म्हणजे १९७१ नंतर वन डे क्रिकेटमध्ये असा पराक्रम झालेला नाही. विंडीजच्या डॅरेन सॅमीने २०१० मध्ये आयर्लंडविरुद्ध ३ विकेट्स व ४ झेल घेतले होते. जोफ्रा आर्चर ( वि. द. आफ्रिका, २०२५) आणि सादत सैद ( वि. सर्बिया, २०२५) यांनीही एका सामन्यात ३ विकेट्स व ४ झेल घेतले आहेत.
तो हत्यारा... माझ्याकडे Video पुरावे आहेत! पाकिस्तानी क्रिकेटपटूवर खळबळजनक आरोप; वर्ल्ड कपच्या तोंडावर पाकड्याचा 'कांड' उघडकसोटी क्रिकेटच्या १४९ वर्षांच्या इतिहासातही ही कामगिरी फक्त दोनवेळा झाली आहे. इंग्लंडच्या फिल एडमंड्सने १९७९ मध्ये क्राइस्टचर्च येथे न्यूझीलंडविरुद्ध चार विकेट्स आणि चार झेल घेतले. नंतर, ऑस्ट्रेलियन स्टार मिचेल जॉन्सनने २०१२ मध्ये WACA येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या अविश्वसनीय दुहेरी झेलची पुनरावृत्ती करण्यात यश मिळवले.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.