ज्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांना कैद केले होते. त्या ठिकाणाहून शिवाजी महाराज यांनी स्वत:ची गनिमीकाव्याने सुटका करुन घेतली. त्या जागेवर स्मारक बांधण्यासाठी आम्ही उत्तर प्रदेश सरकारला विनंती केली होती. त्यासाठी जागा अधिगृहीत करण्याची कारवाई अंतिम टप्प्यात आहे. येथे लवकरच शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्यात येईल. आणि २०३० ला नरेंद्र मोदी हे आग्रा किल्ल्यावर येतील आणि त्यांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी केली जाईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. आग्रा येथील लाल किल्ला परिसरात झालेल्या शिवजयंती कार्यक्रमा प्रसंगी प्रसारमाध्यमाशी बोलत होते,त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
मुगलांचा इतिहास शिकवला जाणार नाहीछत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास देशात शिकवला केला पाहिजे, Ncert ने मुगलांचा इतिहासाला १७ पाने दिली होती. मात्र, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजा यांच्यासाठी केवळ एक पॅराग्राफ दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला २० पाने मिळाली आहेत, मोगलांचा इतिहास शिकवला जाणार नाही
असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
मुघलांनी देशात अत्याचार सुरू केला होता तेव्हा जिजाऊंनी, शिवाजी महाराजांना मुगलांचे काम न करता राजा बनायचे आहे, आणि त्यासाठी लढून स्वराज्य मिळवायचे आहे, असे विचार रुजवले. शिवाजी महाराज हे सूर्य किरणासारखे होते. शिवाजी महाराज जेव्हा स्वर्गवासी झाले, तेव्हा औरंगजेबाला वाटले मी हे स्वराज संपवून टाकेल. पण त्याला माहित नव्हते शिवाजी महाराज यांच्यानंतर संभाजी महाराज नऊ वर्षे लढले. त्याच महाराष्ट्रात औरंगजेबची कबर खोदली गेली असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
लाल किल्ला ही आमची स्वाभिमानाची भूमीलाल किल्ला ही आमची स्वाभिमानाची भूमी आहे. महाराष्ट्रात छत्रपतींचे जल दुर्ग नसते तर हिंदवी स्वराज्य बनले नसते. आग्र्याच्या लाल किल्ल्यामध्ये शिवजयंती साजरी करणे हे विशेष आहे. लवकर उत्तर प्रदेश सरकारच्या मदतीने ज्या ठिकाणी शिवाजी महाराज यांना कैद केले होते त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू होतील असेही त्यांनी सांगितले.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.