पुणे : विवाहविषयक संकेतस्थळावर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने ४४ वर्षीय महिलेची सुमारे ५९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने मागील दीड वर्षांत महिलेस विविध कारणे सांगत पैसे उकळल्यानंतर मोबाईल बंद करून संपर्क तोडला.
याप्रकरणी महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विराज बाळासाहेब भोसले उर्फ सतीश बुरूड (रा. तळेगाव दाभाडे) याच्यासह आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला नगर रस्ता परिसरातील वडगाव शेरी परिसरात राहतात. त्यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये एका विवाहविषयक संकेतस्थळावर नावनोंदणी केली होती. त्यानंतर आरोपीने महिलेशी संपर्क साधून विवाह करण्याची तयारी दाखवली. विश्वास संपादन केल्यानंतर आरोपीने विविध कारणे देत वेळोवेळी पैशांची मागणी केली.
Bhigwan Kidnapping Case : भिगवणमधील तरुणीच्या अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट, तरुणी महिन्याभरापासून आरोपींच्या संपर्कात, पोलिसांची माहितीयाप्रकरणी महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विराज बाळासाहेब भोसले उर्फ सतीश बुरूड (रा. तळेगाव दाभाडे) याच्यासह आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला नगर रस्ता परिसरातील वडगाव शेरी परिसरात राहतात. त्यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये एका विवाहविषयक संकेतस्थळावर नावनोंदणी केली होती. त्यानंतर आरोपीने महिलेशी संपर्क साधून विवाह करण्याची तयारी दाखवली. विश्वास संपादन केल्यानंतर आरोपीने विविध कारणे देत वेळोवेळी पैशांची मागणी केली.
महिलेने मागील दीड वर्षांत आरोपीच्या खात्यात ५९ लाख ३७ हजार रुपये जमा केले. विवाहाबाबत ठोस निर्णय मागितल्यानंतर आरोपीने टाळाटाळ सुरू केली. तसेच, शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. अखेरीस मोबाईल क्रमांक बंद करून संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
दरम्यान, विवाहाच्या आमिषाने फसवणूक करण्याचे प्रकार वाढत असल्याची बाब या घटनेतून पुन्हा समोर आली आहे. विवाहविषयक संकेतस्थळावर नावनोंदणी करताना संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमी तपासावी. तसेच, आर्थिक व्यवहार टाळावेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.