नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा पीए तसेच आरोग्य मंत्र्यांच्या पीएशी ओळख असल्याचे सांगत शासकीय नोकरी व भूखंड मिळवून देण्याचे आमिष दाखवून ७ लाख १ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.
चंदू किसन खोब्रागडे (वय ५०), सुचिता चंदू खोब्रागडे (वय ४५, रा. ब्रह्मपुरी, चंद्रपूर) अशी आरोपींची नाव आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आनंदनगर परिसरात राहणारे युवराज गंगाराम मेश्राम (वय ६०) प्रॉपर्टी डिलिंगचे काम करतात. त्यांची दोन्ही मुले बाहेरगावी शिकायला आहेत. चंदू त्यांचा दूरचा भाचा आहे. १७ मार्च २०१३ रोजी नात्यातील व्यक्तीच्या अंत्यसंस्कारादरम्यान त्यांची ओळख झाली.
Nagpur Fraud: अधिकाऱ्याचा पीए असल्याचे सांगून १.९४ कोटींनी केली फसवणूक; नोकरी, पेट्रोलपंप व विविध सरकारी टेंडर मिळवून देण्याचे आमिष२०१५ मध्ये ते आणि त्यांचे मित्र पाचपावलीतील कार्यालयात बसले असताना, चंदू तिथे आला. त्याने मंत्रालयात प्रभावी व्यक्तींशी ओळखी असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा पीएसोबत ओळख असल्याचे सांगितले. त्यांच्या मार्फत अनेकांना नोकरी लावून दिल्याची बतावणीही केली. यावरून मेश्राम यांनी त्यांच्या मुलाला बारावीनंतर नोकरी लावून देण्याची विनंती केली.
Investment Fraud : गुंतवणुकीचे आमिष दाखवून, ४८ लाखांची फसवणूक; तहसील पोलिस ठाण्यात ठकबाज युवकाविरोधात गुन्हा दाखलचंदूने त्याला आरोग्य विभागात नोकरी मिळवून देण्यासोबतच परिसरातील भूखंड मिळवून देण्याचेही आश्वासन दिले. या आमिषाला बळी पडून मेश्राम यांनी एप्रिल २०१५ ते ऑगस्ट २०१६ दरम्यान रोख आणि धनादेशाद्वारे एकूण ७ लाख १ हजार रुपये दिले. मात्र, दिलेल्या आश्वासनांनुसार नोकरी किंवा भूखंड मिळवून दिला नाही.
पैसे परत मागितल्यावर आरोपी व त्याची पत्नी सुचिता यांनी जिवे मारण्याची धमकी दिली. यावरून मेश्राम यांनी पाचपावली ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी सुरू केली आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.