नारायणगाव, ता. २० : नारायणगाव (ता. जुन्नर) येथे शेवंताई फाउंडेशनच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शिवजन्मोत्सव सोहळा, महाआरती, नेत्र दीपक फायर शो, स्केटिंग, महिलांसाठी वेशभूषा स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
शेवंताई फाउंडेशनच्या वतीने मागील चार वर्षापासून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शिवजयंतीनिमित्त गुरुवारी (ता. १९) सायंकाळी पाच वाजता फाउंडेशनच्या संस्थापिका, माजी जिल्हा परिषद सदस्य राजश्री बोरकर, प्रियांका बोरकर, आकाश बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पुणे- नाशिक महामार्गावरून महिलांची रॅली काढण्यात आली होती. रॅलीमध्ये पारंपरिक वेशभूषा परिधान करून महिला उत्साहात सहभागी झाल्या होत्या. बस स्थानक आवारात पाच ते १० वर्षे वयोगटातील मुलांनी स्केटिंगची प्रात्यक्षिके सादर केली. सायंकाळी सात वाजता येथील पूर्व वेशीवरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे शिवजन्मोत्सव सोहळा, महाआरती, डोळ्याचे पारणे फेडणारा फायर शो आदी कार्यक्रम संपन्न झाले. उद्योजक तात्यासाहेब बोरकर, नीता बोरकर, राजश्री बोरकर, उपसरपंच योगेश पाटे, राजश्री बेनके, सीमा सोनवणे, जयवंत वाजगे, विघ्नहरचे संचालक संतोष खैरे यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या निमित्त महिलांसाठी वेशभूषा स्पर्धा व लकी ड्रॉचे आयोजन केले होते. वेशभूषा स्पर्धेत प्रथम तीन आलेल्या महिलांना फाउंडेशनच्या वतीने अनुक्रमे पाच हजार, तीन हजार, दोन हजार रुपयांची रोख पारितोषिके देण्यात आली. रोहिणी डोळे, प्रियांका बोरकर, अंजली खैरे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी माजी उपसरपंच संतोष वाजगे, ज्ञानेश्वर औटी, भागेश्वर डेरे, अजित वाजगे, विकास तोडकरी, माजी सैनिक एकनाथ वाजगे, ॲड. राजेंद्र कोल्हे, विरोबा पतसंस्थेचे सचिव राजेंद्र पाटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन राजश्री बोरकर, पुष्पा खैरे, पुष्पा जाधव, शीतल ठुसे, प्रांजली भुतडा, मनीषा बोरा, सुजाता डोंगरे यांनी केले. सूत्रसंचालन निवेदक अमोल पानसरे यांनी केले.
वेशभूषा स्पर्धेचा निकाल : प्रथम- शोभा शेटे, नयन हाडवळे. द्वितीय- श्वेता पोखरकर, अस्मिता भोर. तृतीय- पुनम फुलसुंदर, अनुराधा भोर. उत्तेजनार्थ- दीपाली कासार, श्रद्धा जंगम, राजश्री भुजबळ, स्मिता विटे.


07911

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.