देवगड/पाली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील महत्त्वाचे पद भूषवणारे अमात्य नारोपंत नीलकंठ यांच्या देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथील समाधी वृंदावनाचा ऐतिहासिक उलगडा झाला आहे. या महत्त्वपूर्ण शोधावर आधारित शोधनिबंध ‘कोकण इतिहास पत्रिका’ (जानेवारी-मार्च २०२६) मध्ये प्रसिद्ध झाला आहे.
इतिहास संशोधक रणजित हिर्लेकर आणि सुधागड तालुक्यातील संदीप परब यांनी संयुक्तपणे हा सखोल अभ्यास पूर्ण केला आहे. कोकणच्या विशेषतः मराठा कालखंडातील इतिहासाच्या दृष्टीने हा शोध अत्यंत मोलाचा मानला जात आहे.
कोकणच्या सागरी पराक्रमाचा पुरावा! वीरगळावर सापडले प्राचीन नौकायुद्धाचे जिवंत दृश्य, खारेपाटण ठरू शकते भविष्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळतसेच सर्व्हे नकाशांच्या आधारे नारोपंत अमात्य यांची समाधी नेमकी श्री कुणकेश्वर मंदिरालगत असल्याचे सिद्ध झाले आहे.
इतिहासाला नवी दिशानारोपंत नीलकंठ यांनी स्वराज्याच्या प्रशासनात
अमात्य म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, त्यांच्या समाधी स्थानाबाबत अनेक वर्षे
अनभिज्ञता होती.
हिर्लेकर आणि परब यांच्या या प्रयत्नांमुळे आता कुणकेश्वर
खारेपाटणमध्ये सागरी लढायांच्या पाऊलखुणायेथील त्या वृंदावनाला ऐतिहासिक ओळख प्राप्त झाली आहे. या संशोधनामुळे इतिहासातील अनेक मूलभूत गोष्टींवर प्रकाशझोत टाकण्यात आला असून, त्यानिमित्ताने इतिहासातील नव्या गोष्टी समोर आल्या आहेत.
कोकणचा ऐतिहासिक वारसाविशेष म्हणजे या परिसराशी आणि कुणकेश्वर देवालयाशी अमात्यांच्या वंशजांचा असलेला दीर्घकालीन संबंध या संशोधनातून अधोरेखित झाला आहे. हा शोधनिबंध इतिहासप्रेमी, संशोधक आणि अभ्यासकांसाठी एक महत्त्वपूर्ण संदर्भ ग्रंथ ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. कोकणच्या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.
संशोधनातून महसुली नोंदी १८७४ मधील वृंदावन नोंदी आणि १९५४-५५ चे ७/१२ उतारे यांचा आधार घेण्यात आला आहे.
- रणजित हिर्लेकर, इतिहास संशोधन
मराठा इतिहासाच्या अभ्यासाला एक नवे परिमाण मिळाले असून, पर्यटनाच्या दृष्टीनेही या स्थानाचे महत्त्व या संशोधनामुळे वाढणार आहे.
- संदीप परब, संशोधक
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.