जुईनगर : अमेरिकेकडून भारतीय हापूस आंब्यावर आकारले जाणारे १८ ते ५० टक्क्यांपर्यंतचे आयात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने आंबा निर्यात क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. निर्यातदारांच्या अंदाजानुसार, यंदा हंगामात दररोज सुमारे पाच हजार पेट्या आणि एकूण १० हजार टनांपर्यंत आंबा परदेशात पाठवला जाऊ शकतो. यामुळे निर्यात वाढून शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.


शुल्क माफीमुळे भारतीय हापूसअमेरिकन बाजारात स्पर्धात्मक दरात उपलब्ध होईल. यापूर्वी जास्त शुल्कामुळे भारतीय आंबा महाग पडत होता. विशेषतः कोकणातील रत्नागिरी व देवगड पट्ट्यातील उत्पादकांना याचा सर्वाधिक फायदा होण्याची अपेक्षा आहे. यंदा अवकाळी पाऊस आणि थ्रिप्स या किडीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट झाली आहे.

Mumbai Weather: मुंबईला प्रदूषणाचा विळखा! हवेचा दर्जा खालावला; धोक्याची पातळी ओलांडल्याने आरोग्यतज्ज्ञांचं महत्त्वाचं भाकीत

काही भागांत फळधारणा कमी झाली, तर काही ठिकाणी फळांची गुणवत्ता प्रभावित झाली. तरीही शुल्क रद्द झाल्याने निर्यात वाढल्यास कमी उत्पादन असूनही शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू शकतो. उत्पादन घटले असले तरी निर्यात मागणी वाढली तर बाजारभाव स्थिर किंवा वाढत्या पातळीवर राहू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

स्थानिक बाजारात आवक कमी

निर्यात वाढल्याने राज्यातील स्थानिक बाजारात आवक कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः मुंबई आणि उपनगरांमध्ये आंब्याचा पुरवठा मर्यादित राहू शकतो. त्यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये आंब्याचे दर वाढू शकतात. आंबा आवक कमी राहिल्यास सुरुवातीला जास्त दर द्यावा लागू शकतो. तर हंगामाच्या मध्यात किमती स्थिर होण्याची शक्यता असून, ग्राहकांना हंगामाच्या सुरुवातीला जास्त दर मोजावा लागण्याची शक्यता आहे.

Mumbai News: शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा अमेरिकेबरोबरचा व्यापार करार का केला? हर्षवर्धन सपकाळांची भाजपवर टीका

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.