26426
रेडी येथे लोकप्रतिनिधींचा सत्कार
वेंगुर्ले ः रेडी येथे आयोजित ‘सरपंच चषक २०२६’ या क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या क्रीडा महोत्सवाला कुडाळ-मालवणचे आमदार नीलेश राणे यांनी सदिच्छा भेट देत खेळाडूंचे कौतुक केले. तसेच क्रिकेट सामन्यांचा मनमुराद आनंद लुटला. सरपंच रामसिंग राणे व रेडी क्रिकेट मंडळाच्यावतीने आमदार राणे यांचा सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य प्रीतेश राऊळ व पंचायत समिती सदस्य प्रियांका घाटवळ यांचा आमदार राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य दादा साईल, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, कौशिक परब, सागर राणे, अण्णा गडेकर, तुषार साळगावकर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----
26427
आरोस नेहरू विद्यालयाला साहित्य
आरोंदा ः आरोस बाजार येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यामंदिर शाळेला मळगावचे सुपुत्र श्रीकृष्ण ठाकूर यांनी प्रिंटर भेट म्हणून दिला. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हेमंत कामत, उपाध्यक्षा सिया राऊळ तसेच सदस्य उपस्थित होते. राजनंदा शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. शाळेला सहकार्य करणारे श्री. ठाकूर यांचे मुख्याध्यापिका नियोजिता नाईक यांनी आभार मानले. यावेळी पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.