नागपूर : सोनेगाव भागात निर्माणाधीन इमारतीवरून पडून एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस ३० जानेवारीला घडली. याप्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत ठेकेदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सोनेगाव पोलिसांनी दाखल केला.
मुन्नालाल सहसराम गौतम (वय ४५, रा.योगेश्वरीनगर, दिघोरी) असे आरोपी ठेकेदाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिहान परिसरातील अंजनी एक्झॉटिका इमारतीवर काम सुरू होते.
३० जानेवारीला दुपारी चार वाजताच्या सुमारास इमारतीमध्ये बांधकाम करणारे मिस्त्री लवकुश बद्री निषाद (वय २०, मूळ रा. उत्तरप्रदेश) हे ११ व्या मजल्यावर पाण्याचा वॉल सुरू करण्यासाठी गेले होते. अचानक तोल जाऊन खाली कोसळले. यात ते गंभीर जखमी झाले.
सहकाऱ्यांनी त्यांना एम्स रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेची सुरुवातीला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. तपासादरम्यान मृतकाची पत्नी कृष्णा लवकुश निषाद यांनी दिलेल्या जबाबात ठेकेदार मुन्नालाल गौतम यांनी कोणतीही सुरक्षा साधने, सुरक्षाजाळी किंवा ग्रिल उपलब्ध करून दिली नसल्याचा आरोप केला.
Sangamner Crime: संगमनेरात अवैध वाळू उपशावर कारवाई; ६० लाख १७ हजार रुपयांची वाहने जप्त, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल!निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडून मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी ठेकेदाराविरुद्ध कलम १०६(१) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.