Super 8 Group 1 qualification scenario T20 World Cup : वेस्ट इंडिजने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर ८ मधील ग्रुप १ मध्ये सोमवारी झिम्बाब्वेला पराभूत केले. या विजयाने मात्र टीम इंडियाचे उपांत्य फेरीत पोहोचण्याचे गणित बरेच बदलले आहे आणि आता सूर्यकुमार यादवच्या टीमला बरीच बेरीज-वजाबाकी करावी लागणार आहे. वेस्ट इंडिजच्या २५४ धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ १४७ धावांत तंबूत परतला. वेस्ट इंडिजने १०७ धावांनी विजय मिळवून इतिहास रचला आणि ग्रुप १ मध्ये अव्वल स्थानावर झेप घेतली, तेही तगड्या नेट रन रेटने.


वेस्ट इंडिजचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी परतल्यानंतर शिमरोन हेटमायर आणि रोव्हमन पॉवेल यांनी शतकी भागीदारी केली. पॉवेल ३५ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह ५९ धावांची खेळी केली. त्यानंतर शेरफाने रुथरफोर्डने हेटमायरसोबत धावांची गती वाढवली. हेटमायर ३४ चेंडूंत ७ चौकार व ७ षटकारांसह ८५ धावांची खेळी केली. शतक हुकल्याची खंत विंडीज चाहत्यांमध्ये दिसली.

T20 WC, WI vs ZIM: ७ चौकार, ७ षटकार... वानखेडेवर हेटमायरचं वादळ; झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना झोडपत विंडीजसाठी रचला वर्ल्ड रेकॉर्ड

रुथरफोर्डने १३ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह नाबाद ३१ धावा चोपल्या. रोमारियो शेफर्ड ( २१) व जेसन होल्डर ( १३) यांनी संघाला ६ बाद २५४ धावांपर्यंत पोहोचवले. लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचे ६ फलंदाज ९४ धावांवर माघारी परतल्याने विंडीजचा विजय निश्चित केला होता. पण, विंडीजला १८व्या षटकापर्यंत त्यावर शिक्कामोर्तब होण्याची प्रतीक्षा पाहावी लागली.

१२२

हेटमायर आणि रोव्हमन पॉवेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी आज १२२ धावांची भागीदारी केली आणि वेस्ट इंडिजसाठी ही या विकेटसाठी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी लेंडल सिमन्स व चार्ल्स यांनी ९७ धावांची भागीदारीचा विक्रम केला होता.

५२

सिकंदर रझा यांना आजच्या सामन्यात ५२ धावा दिल्या आणि झिम्बाब्वेच्या गोलंदाजाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ही सर्वात महागडी स्पेल ठरली.

IND vs SA : अक्षर पटेलला का वगळले? प्रशिक्षकाचं उत्तर ऐकून चाहत्याचं टाळकं सटकलं; म्हणे, रिंकू सिंग....

ब्रँड एव्हान्सने ३१ चेंडूंत ४३ धावांची खेळी केली आणि झिम्बाब्वेचा संपूर्ण डाव १७.४ षटकांत १४७ धावांत गडगडला. गुदाकेश मोतीने ४-१-२८-४ अशी स्पेल टाकली. अकील होसेनने ४-१-२८-३ आणि मॅथ्यू फोर्ड ३.४-०-२७-२ अशी गोलंदाजी केली. जेसन होल्डरने एक विकेट घेतली.

T20 World Cup Points table Super Eights, Group 1

वेस्ट इंडिजने या विजयासह २ गुणांची कमाई केली आणि ५.३५० असा सर्वोत्तम नेट रन रेट करून ग्रुप १ मध्य अव्वल स्थान पक्के केले. दक्षिण आफ्रिका २ गुण व ३.८०० अशा नेट रन रेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा नेट रन रेटच भारताची डोकेदुखी वाढवणार आहे. विंडीज आणि आफ्रिका यांना आता उर्वरित दोन सामन्यांत प्रत्येकी १ विजय पुरेसा आहे, तेच भारताला दोन्ही सामने जिंकावे लागतील. तेही मोठ्या फरकाने, तर त्यांचा -३.८०० नेट रन रेट सुधारेल अन्यथा हाच नेट रन रेट घात करेल. दक्षिण आफ्रिकेने उर्वरित दोन सामन्यांत विजय मिळवल्यास भारताला फायदा होऊ शकतो.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.