रेबिजच्या भीतीमुळे तरुणाने केली आत्महत्या
अनेक दिवसांपासून तरुण होता नैराश्यात
तरुणाच्या आत्महत्येने कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर
संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
देशासहित राज्यभरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याचं पाहायलं मिळत आहे. कोर्टानेही तत्काळ भटके कुत्रे हटवण्याचे आदेश दिले होते. भटक्या कुत्र्यांनी अनेक लोकांवर जीवघेणे हल्ले केले आहेत. कल्याणमध्येही भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. अशाच एका भटक्या कुत्र्याने कल्याणमधील ३० वर्षीय तरुणाचा चावा घेतला. मात्र, कुत्रा चावल्यानंतर घाबरलेल्या ३० वर्षीय तरुणाने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
कल्याण पूर्व येथील तीस गाव नाका परिसरात धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आलं आहे. भटका कुत्रा चावल्याने मला रेबिज होईल, या भीतीपोटी ३० वर्षीय तरुणाने आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. आयस विश्वनाथ अमीन असे तरुणाचे नाव आहे. आत्महत्या करण्याआधी त्याने एक चिठ्ठी लिहिली. या चिठ्ठीत त्याने आत्महत्येचे कारण सांगितलं आहे.
इंजेक्शन लावून सफरचंद विक्रीचा आरोप, चौकशीत निर्दोष सापडला; आता विक्रेत्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळकाही दिवसांपूर्वी आयस कल्याणमधीलतीस गावात पायी चालत होता. त्यावेळी त्याला एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला. भटका कुत्रा चावल्यानंतर त्याने रुग्णालयात जाऊन रेबिजचे इंजेक्शन घेतले होते. डॉक्टरच्या सांगण्यांनुसार आयस औषधोपचार घेत असल्याची माहिती मिळतेय. परंतु याचदरम्यान रेबिजची लक्षणे दिसू लागल्याने तो प्रचंड भयभीत झाला होता.
अमरावतीच्या मेळघाटात पिकअप ५० फूट दरीत कोसळला; ५ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीतीआयसला रेबिज होण्याच्या भीतीने घाबरून गेला होता. गेल्या काही दिवसांपासून आयस नैराश्यात होता. परंतु आयसने आज सोमवारी टोकाचा निर्णय घेतला. त्याने आत्महत्या करण्याआधी एक चिठ्ठी लिहिली. या चिठ्ठीत आयसने रेबीजच्या भीतीने आत्महत्या करत असल्याचे नमूद केले. त्याच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आयसच्या मृत्यूने तो राहत असलेल्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.