आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री रिमा लागू यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं. बॉलिवूडची आई म्हंटली की सगळ्यांसमोर रिमा यांचाच चेहरा येतो. मराठी सिनेमांमध्ये अढळ स्थान निर्माण केल्यानंतर त्यांनी 'मैंने प्यार किया', 'हम आपके हैं कौन', 'हम साथ साथ हैं', 'कुछ कुछ होता हैं' सारख्या चित्रपटात काम केलं. मात्र त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये जितकं यश पाहिलं तितकंच त्यांचं वैयक्तिक आयुष्य कठीण प्रसंगाने वेढलेलं होतं. त्यांची लव्हस्टोरी फिल्मी होती. मात्र त्याचा शेवट घटस्फोटाने होईल असा विचार त्यांनी कधीही केला नसेल.


रिमा यांचं खरं नाव नयन बडबडे होतं. मुंबईतील गिरगावातील एका चाळीत त्यांचा जन्म झाला. पुण्यातील हुजूरपागा येथील कन्या शाळेत त्या शिकल्या. सुरुवातीला तर त्यांना तिथे मुळीच जायचं नव्हतं मात्र तिथे असलेला नाट्यवाचनाचा वर्ग त्यांना आवडू लागला. अभिनय आवडत असल्याने १२ वीत अर्धवट शिक्षण सोडलेल्या रिमा यांनी आईच्या हट्टामुळे बीए पूर्ण केलं. अभिनय करताना त्यांनी बँकेत नोकरी केली. अशाच एकदा बँकेमधून स[नाटकाच्या स्पर्धांसाठी गेलेल्या असताना त्यांची भेट विवेक लागू यांच्याशी झाली. विवेक तेव्हा २३ वर्षांचे होते तर नयन फक्त १८ वर्षांच्या होत्या. १९७८ साली ते विवाहबंधनात अडकले. इथेच नयन यांची झाली रिमा बडबडे.


मराठी नाटकात उत्तम काम करत असलेल्या रिमा यांना 'सिंहासन' हा मोठा चित्रपट मिळाला. दुसरीकडे त्यांची नाटकं उत्तम सुरू होती. मात्र त्यांना हवी तशी ओळख मिळाली नव्हती. अशातच लेक मृण्मयी हिचा जन्म झाला. १९८० ते १९८८ पर्यंत त्यांची अभिनयातील कारकीर्द सुरू तर राहिली मात्र करिअरसाठी धडपड करत असताना अगदी फिल्मी स्टाइलने सुरू झालेली त्यांची लव्हस्टोरी कोलमडू लागली. विवेक आणि त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यांच्यात भांडणं होऊ लागली. एकमेकांशी पटेनासं झालं. अखेर एकमेकांपासून वेगळं होणं हा एकच पर्याय उरलाय असं लक्षात येताच रिमा आणि विवेक लागू यांनी घटस्फोट घेण्याचं ठरवलं.


या घटस्फोटानंतर त्यांनी मुलीची कस्टडी स्वतःकडे ठेवली. सोबतच रिमा लागू हे नावही त्यांनी बदललं नाही. मात्र फार कमी वयात त्या अचानक चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेल्या. त्यांच्या मृत्यूने चित्रपटसृष्टीने एक दमदार अभिनेत्री गमावली.

व्हाइट थीम आणि गोल्डन टच फर्निचर... 'घरोघरी...'मधील रेश्मा शिंदेचं खऱ्या आयुष्यातलं घर पाहिलंत का?

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.