Government Free Schemes: भारतामध्ये सामान्य नागरिकांचं जीवन अधिक सोपं व्हावं यासाठी केंद्र सरकार दरवर्षी हजारो कोटी रुपये विविध कल्याणकारी योजनांवर खर्च करतं. मात्र जागरूकतेच्या अभावामुळे अनेक लोकांना या योजनांचा लाभ घेता येत नाही. काहींना सरकारी प्रक्रिया अवघड वाटते, काहींना आपण या योजनांसाठी पात्र आहोत हे माहीत नसतं तर काहींना अश्या काही योजना आहेत हेच माहीत नसतं... प्रत्यक्षात या योजना तुमच्या घरगुती बजेटपासून ते मुलांच्या शिक्षणासाठी मोठा आधार ठरू शकतात. अशाच काही महत्त्वाच्या सात सरकारी योजनांची माहिती जाणून घेऊया.

1. आयुष्मान भारत योजना – 5 लाखांपर्यंत मोफत उपचार

अचानक उद्भवलेला आजार कोणत्याही कुटुंबासाठी मोठा आर्थिक ताण ठरू शकतो. मात्र सर्वसामान्यांना हा ताण होऊ नये यासाठी सरकारची आयुष्मान भारत योजना महत्त्वाची ठरते. याअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा दिली जाते. कॅन्सर, हृदयरोग यांसारख्या गंभीर आजारांचाही यात समावेश आहे. आयुष्मान कार्ड असल्यास देशभरातील अनेक सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचार मिळू शकतात.

2. प्रधानमंत्री आवास योजना – घरासाठी आर्थिक मदत

स्वतःचं घर घेणं अनेकांचं स्वप्न असतं, पण कर्जाच्या हप्त्यांमुळे ते अवघड होतं. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रथमच घर खरेदी करणाऱ्यांना होमलोनवर व्याज सवलत दिली जाते. या योजनेतून सुमारे 2.67 लाख रुपयांपर्यंत सबसिडी मिळू शकते, ज्यामुळे कर्जाची रक्कम आणि EMI दोन्ही कमी होतात.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठी वाढ! चांदीही 3 लाखांवर; गुंतवणूकदार खुश, मात्र सर्वसामान्यांची चिंता वाढली; पाहा आजचा भाव 3. मुद्रा योजना – व्यवसायासाठी कर्ज

लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची गरज असते. देशभरात असे व्यवसाय वाढावे आणि लोकांना रोजगार मिळवा यासाठी केंद्र सरकारची मुद्रा योजना महत्वाची ठरते. यात शिशु, किशोर आणि तरुण अशा तीन प्रकारांत कर्ज दिलं जातं. या योजनेत 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं आणि त्यासाठी तारण देण्याची आवश्यकता नसते. छोट्या उद्योजकांसाठी ही योजना उपयुक्त ठरते.

4. सुकन्या समृद्धी योजना – मुलींसाठी बचत योजना

10 वर्षांखालील मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानला जातो. या योजनेत मिळणारे व्याज, गुंतवणूक आणि परतावा हे सर्व करमुक्त असतात. मुलीच्या शिक्षणासाठी आणि भविष्यात लग्नासाठी मोठा निधी तयार करण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरते.

5. नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल – विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षण सोडावं लागतं. त्यामुळे सरकारने स्कॉलरशिप योजना सुरू केली आहे. यासाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर विविध शिष्यवृत्ती योजना उपलब्ध आहेत. शाळेपासून उच्च शिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांना या माध्यमातून आर्थिक मदत मिळू शकते. वेळेत अर्ज केल्यास शिष्यवृत्तीचा लाभ घेता येतो.

6. उज्ज्वला योजना – मोफत गॅस कनेक्शन

ग्रामीण भागातील अनेक महिला अजूनही चुलीवर स्वयंपाक करतात. त्याच्या त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यांच्यासाठी शासनाने उज्ज्वला योजना सुरू केली आहे. यात पात्र महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिलं जातं. यासोबतच गॅस सिलिंडरवर सबसिडीही मिळते. या योजनेमुळे स्वयंपाक सुरक्षित आणि सोयीस्कर होतो.

7. पीएम किसान योजना

शेतकऱ्यांना पीक उभारणीसाठी आर्थिक मदत म्हणून पीएम किसान योजनेची सुरुवात केली. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा होते.

Multibagger Stock: पॉवर सेक्टरचा मल्टीबॅगर! 2 रुपयांचा शेअर पोहोचला 135 वर, अडीच वर्षांत 6,750% रिटर्न; गुंतवणूकदार झाले मालामाल

या सर्व योजना लोकांसाठीच असून त्याबद्दल अधिक माहिती संबंधित अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. या ठिकाणी महत्वाची गोष्ट म्हणजे यांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आणि बँक खाते अद्ययावत ठेवणं आवश्यक आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.