-अशोक सिदवाडकर
माळशिरस: तालुक्यातील सर्वच गावातील पाण्याची सध्याची स्थिती चांगली असून, तालुक्यातील एकूण ८४ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, २१ गाव तलाव आणि ९९ पाझर तलावांमध्ये ३० ते ४० टक्के पाणीसाठा आहे. मार्चपर्यंत तरी पाणीटंचाई भासणार नसल्याची स्थिती आहे.
Pune News: महसूल विभागाचा निर्णय! राज्यातील ११ अपर जिल्हाधिकारी, ६९ अपर तहसील कार्यालयांची नव्याने होणार निर्मिती..गतवर्षी मार्चमध्येच चार गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. यावर्षी मार्चनंतर डिसेंबरअखेर ५८ गावांतील ४४० वाड्या-वस्त्यांवर संभाव्य पाणी टंचाई भासणार असून, त्याचा आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती पाणीपुरवठा अभियंता एस. एन. करवते यांनी दिली.
गतवर्षी तालुक्यात मार्चमध्ये गारवाड, मगरवाडी, सुळेवाडी, बचेरी या ४ गावांत तर एप्रिलमध्ये शिंगोर्णी, शिवारवस्ती, निटवेवाडी, पळस ६ तर मे महिन्यात मंडळ, भांब, फडतरी या सहा गावांमध्ये तर मे महिन्यानंतर लोंढे-मोहितेवाडी, कदमवाडी, लोणंद, जळभावी, पठाणवस्ती या सहा असे एकूण १६ टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. गतवर्षी सरासरीपेक्षा जास्त झालेल्या पावसामुळे सध्या पाण्याची स्थिती चांगली आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून काही गावांमध्ये टंचाई भासू शकते. यासाठी संभाव्य टंचाई आराखडा सादर करण्यात आला आहे. आजअखेर तरी कोणत्याही गावाचा प्रस्ताव आला नसल्याची माहिती करवते यांनी दिली.
तालुक्यातील पाणीसाठ्याची स्थितीतालुक्यात ८४ केटी वेअर असून त्याची साठवण क्षमता १२ हजार ३७१ टीएमसी आहे. २१ गाव तलाव, ९९ पाझर तलाव, १७२ सिमेंट बंधारे आहेत. यामध्ये सध्या ३० ते ४० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तालुक्यात ९ पाझर तलावाची दुरुस्ती, ४ सिमेंट बंधाऱ्याची दुरुस्ती तर इस्लामपूर येथे एका नवीन बंधाऱ्याचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती लघु पाटबंधारे उप अभियंता तेजस चिखलीकर यांनी दिली.
Interfaith love Story: कॉलेज जीवनात अडकले ‘प्रेमाच्या बेडीत’; जाती-धर्माच्या चौकटीपलीकडचे प्रेम, फिरदोस-मेहवश यांची प्रेमकहाणी! ... तर टँकर लागणार नाहीजळभावी गावाला सातत्याने टँकरने पाणी पुरवठा करावा लागत होता. परंतु गेल्या दोन वर्षांपासून गावाने सर्वानुमते तलावातील पाणी उपसा न करण्याचा निर्णय घेतल्याने गावठाणास पाण्यासाठी टँकरची गरज लागली नाही. यावर्षीही पाणी उपसा न केल्यास पिण्याच्या पाण्यासाठी टँकर लागणार लागल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.