जायकवाडी : बालानगर (ता. पैठण) परिसरात घडलेल्या गुंतागुंतीच्या खून प्रकरणाचा एमआयडीसी पैठण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला. दारूच्या नशेत झालेल्या वादातून, बोटाचा चावा घेतल्याच्या रागातून ही हत्या झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.


सोमवारी (ता. २३) सकाळी बालानगरजवळील शेतात अहमद जाफर पठाण याचा मृतदेह आढळून आला होता. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांना घातपाताचा संशय आला. सहायक पोलिस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत दोन पथके तयार केली. तपासादरम्यान तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित केशवराव छगन चव्हाण याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करण्यात आली, तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली.


ही कारवाई सपोनि ईश्वर जगदाळे, फौजदार कविता जगताप आणि त्यांच्या पथकातील राहुल मोहोतमल, कत्तारसिंग सिंगल, ज्ञानेश्वर भवर, मिलिंद घाटेकश्वर, कृष्णा उगले, विष्णू कोलते, रामेश्वर पंडित यांच्यासह होमगार्ड वाल्मीक घोंगडे, श्रीकांत त्रिभुवन, नंदू मगरे आणि राहुल जाधव यांनी केली.

असा घडला थरार

केशवराव चव्हाण हा आपल्या पत्नीसह रिक्षाने बालानगरकडे जात असताना अहमद पठाण हा देशी दारू दुकानाच्या एका इलेक्ट्रिक पोलजवळ बसला होता. दारूच्या नशेत दोघांमध्ये वाद झाला. या वादात अहमदने केशवरावच्या उजव्या हाताच्या बोटाला जोराचा चावा घेतला. तो बोट सोडत नसल्याने संतापाच्या भरात केशवरावने जवळच पडलेला दगड उचलून अहमदच्या कपाळावर मारला आणि तिथून पळ काढला. या मारहाणीतच अहमदचा मृत्यू झाला.

Kolhapur Crime : गुन्ह्यात घट झाली तरी, दुचाकी, चारचाकींची चोरी अन् जोरात गांजा तस्करी; दोन वर्षांतील चित्र नागरिक हैराण हिलांच्या सुरक्षेवर पोलिसांचा भर तपासाचे मोठे आव्हान

घटनास्थळ निर्जन भागात असल्याने सुरवातीला कोणताही ठोस पुरावा मिळत नव्हता. त्यामुळे तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले होते. मात्र, पोलिसांनी गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाची मदत घेतली. बालानगर, डोणगाव तांडा, टेंकडी तांडा, दरेगाव, सुंदरवाडी ते थेट मुकुंदवाडी परिसरात शोधमोहीम राबवून पोलिसांनी शिताफीने आरोपीला जेरबंद केले.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.