चाकूर : राज्यात महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना सोमवारी (ता. २३) चालू महिन्याचा हप्ता जमा झाला असला तरी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे हप्ते न मिळाल्याने अनेक महिला वंचित राहिल्या आहेत. यामुळे लाभार्थींमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यावर दरमहा दीड हजार रुपये आर्थिक मदत जमा करण्याची तरतूद आहे. यासाठी महिलांना केवायसी करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. या केवायसीमध्ये चुक झाल्यामुळे अनेक महिलांचे नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे पैसे जमा झाले नव्हते.
यामुळे महिलांनी राज्यभरात आंदोलनाला सुरवात केली होती. याची दखल घेत महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी केवासीमध्ये चूक झालेल्या महिलांना दुरुस्तीसाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. तालुक्यातील जवळपास अडीच हजार महिलांची केवायसी चुकलेली होती.
यात ज्या महिलांनी चुकीच्या केवायसीची दुरुस्ती केली त्यांना इतर महिलांप्रमाणे जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाला आहे. मात्र, मागील दोन महिन्यांचे हप्ते खात्यावर न आल्याने महिलांनी संबंधित विभागाकडे चौकशी सुरू केली आहे.
Ladki Bahin Yojana लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांसाठी आनंदाची बातमी! खात्यात 4500 रुपये जमा होणार, एकनाथ शिंदेची मोठी घोषणातसेच ज्यांनी ३१ डिसेंबरच्या मुदतीत केवायसीच केली नव्हती अशा महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. यासह अनेक कारणांवरून महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणे बंद झालेले आहे. नोव्हेंबर व डिसेंबरचे थकीत हप्ते तातडीने देण्यात यावेत, सर्वांसाठी केवायसी सुरु करावी अशी मागणी महिलांकडून होत आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.