पुणे : ‘‘अयोध्येतील श्रीराम मंदिर हे केवळ श्रीरामलल्लाचे भव्य मंदिर नाही, तर ते भारतीयांच्या मनातील राष्ट्रमंदिर आहे,’’ असे मत श्री राम मंदिराच्या बांधकाम प्रकल्पात मुख्य अभियंता असलेले जगदीश आफळे यांनी व्यक्त केले. येत्या वर्षभरात मंदिराचा संपूर्ण ७० एकरचा परिसर मूळ मंदिर आरेखनानुसार पूर्ण होऊन दर्शनासाठी खुला होईल, असेही त्यांनी सांगितले.

Satara News: पाचगणीत ‘ईडी’ची कारवाई! मनी लाँडरिंगप्रकरणी जुनैद मेमन यांच्या तीन मिळकती ताब्यात; गुप्तता अन् माहिती देण्यास टाळाटाळ!

‘राममंदिर- कथा मंदिर उभारणीची’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. आफळे यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीतील विविध टप्प्यांतील अनुभव कथन केले. या वेळी मूर्तिशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, श्रीराम मंदिर भक्तिदान सेवा योजनेच्या माधुरी आफळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह प्रवीण दबडघाव, साकेत फाउंडेशनचे विश्वस्त विनीत कुबेर आदी उपस्थित होते.


आफळे यांनी २ नोव्हेंबर २०१९ मधील सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालापासूनची माहिती आणि आकडेवारी देत, मंदिर निर्मितीची प्रक्रिया सांगितली. मंदिरासाठी आजवर १३४ आंदोलने झाली, शेकडोंनी प्राणार्पण केले. हिंदूंसह जैन आणि शीख समाजाचाही मोठा सहभाग यामध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. २०२०मध्ये मंदिराचे भूमिपूजन झाल्यावर पाया खोदताना या ठिकाणी मूळ मंदिरांचे अनेक अवशेष मिळाले.

Organ Donation:वडिलांच्या दातृत्वामुळे मुलाला नवजीवन;मूत्रपिंड प्रत्यारोपण, ससून रुग्णालयात शस्त्रक्रिया यशस्वी, कुटुंबियाच्या डाेळ्यात पाणी!

अनेक शिलालेख मिळाले. त्यावरून न्यायालयात पुन्हा नव्याने कालनिर्णयन झाले असून, इसवी सन पूर्व १३व्या शतकापर्यंतच्या इतिहासावर प्रकाश पडला आहे, असेही त्यांनी सांगितले. देशातील विज्ञान-तंत्रज्ञान संशोधन संस्थांनी मंदिरातील रामलल्लाच्या ललाटावर सूर्यकिरणाभिषेक होण्याची यांत्रिक-तांत्रिक व्यवस्था ३१९ वर्षे सुरू राहील, अशी व्यवस्था केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. साकेत फाउंडेशन आणि अमोल रावेतकर यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.