GIRISH OAK REACTS TO SACHIN PILGAONKAR: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी अभिनयासह दिग्दर्शनामध्ये सुद्धा आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यांनी त्यांच्या करिअमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे केले. हिंदी सिनेसृष्टीत सुद्धा स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. परंतु अनेकवेळा त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांना ट्रोल केलं जातं.


दरम्यान अशातच आता अभिनेते गिरीश ओक यांनी सचिन पिळगांवकर यांची बाजू घेतलीय. त्यांनी कलाकारांवर होणाऱ्या ट्रोलिंगवर भाष्य केलय. तसंच ट्रोलर्संना त्यांनी कडक शब्दात सुनावलय. 'एक नागरिक म्हणून काहीच कसं वाटत नाही?' असं म्हणत त्यांनी ट्रोलर्संची चांगलीच खरडपट्टी घेतलीय.


गिरीश ओक म्हणाले की, 'कमेंट करणं, ट्रोल करणं हा रिकामटेकड्या लोकांचं काम आहे. ही सगळी चेहरा नसलेली माणसं असतात. त्यांना रिअॅक्ट करण्याखेरीज काही काम नसतं. यांच्या कमेंट्समुळे माणूस डिस्टर्ब सुद्धा होऊ शकतो. अनेकदा तर 200, 300 वाईट कमेंट्स असतात आणि त्यातून एखादी चांगली कमेंट्स निघते.'





View this post on Instagram

A post shared by Supriya Pilgaonkar (@supriyapilgaonkar)