म्हसळा : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून करून मृतदेह जंगल परिसरात टाकून दिल्याप्रकरणी म्हसळा पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. सतीश चव्हाण असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याने पत्नी निकिता राठोड (वय अंदाजे २२) हिची निर्घृण हत्या (Raigad Crime News) केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.(Raigad Crime News)
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सतीशचा विवाह अवघ्या सहा महिन्यांपूर्वी त्याच्या सख्ख्या मामाची मुलगी निकिता हिच्याशी झाला होता. विवाहानंतर हे जोडपे कर्नाटकातील गुरबर्गा येथून रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात आले होते. येथे चिरेखाणीवर मजुरीचे काम करत होते. सुरुवातीला दोघांचे संसारिक आयुष्य सुरळीत सुरू होते; मात्र काही दिवसांतच सतीशने निकिताच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. यावरून वारंवार वाद होत असल्याचे तपासात समोर आले आहे.(Raigad Crime News)
तसेच निकिताकडून माहेरहून पैसे आणण्याचा तगादा सतीश लावत होता. पैशांवरून आणि संशयातून तो तिला शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याची माहिती निकिताच्या नातेवाईकांनी दिली आहे. घटनेच्या दिवशी दोघांमध्ये तीव्र वाद झाला. संतापाच्या भरात सतीशने निकितावर हल्ला केला. तिचा मृत्यू झाल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने मृतदेह जवळील जंगल भागात नेऊन टाकल्याचे समोर आले.(Raigad Crime News)
दरम्यान, निकिता बेपत्ता असल्याची तक्रार नोंद झाल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली. चौकशीदरम्यान सतीशची विधाने विसंगत आढळल्याने पोलिसांनी त्याच्यावर संशय घेत सखोल चौकशी केली. अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार जंगल परिसरातून निकिताचा मृतदेह हस्तगत करण्यात आला.(Raigad Crime News)
म्हसळा पोलिसांनी आरोपी सतीश चव्हाण याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून, अवघ्या सहा महिन्यांत संसाराचा असा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास सुरू आहे.(Raigad Crime News)
आणखी वाचा
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.