BMC प्रभाग समित्यांच्या निवडणुकीवर राज ठाकरे मनसे: मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग समितीच्या निवडणुकीत (BMC Ward Committees Election 2026) मनसे तटस्थ राहण्याची भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवकाची एक जागा न मिळाल्यामुळे मनसे नाराज असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. (Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election 2026)


ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबई महानगर पालिकेत 3 स्वीकृत नगरसेवक झाले या पैकी एक नगरसेवक मनसेचा व्हावा, अशी मनसेची अपेक्षा होती.  स्वीकृत नगरसेवक पद न दिल्यामुळे काही प्रभाग समितीचे अध्यक्ष पद ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेला देण्यात येणार होते, अशी चर्चा दोन पक्षाच्या नेत्यांमध्ये झाली. मात्र आता प्रभाग समितीच्या निवडणुकीत मनसे तटस्थ राहण्याची भूमिका मनसे घेत असल्याची माहिती आहे. मनसेच्या या भूमिकेमुळे फटका ठाकरेंच्या शिवसेनेला बसू शकतो तर फायदा महायुतीला होऊ शकतो.


मुंबईतील 17 प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी आज अर्ज सादर केले जाणार- (BMC Ward Committees Election)


मुंबई महापालिकेतील 17 प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी आज अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडेल. पुढील तीन दिवसांत या निवडणुका टप्प्याटप्प्याने होणार आहेत. महापौर-उपमहापौर निवडीनंतर ही पहिली मोठी राजकीय चाचणी मानली जात असल्याने सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे.


निवडणूक कार्यक्रम- (BMC Ward Committees Election 2026)



  1. 5 मार्च (गुरुवार) – C, D, E, F दक्षिण, F उत्तर, R उत्तर, R मध्य, R दक्षिण, P दक्षिण

  2. 6 मार्च (शुक्रवार) – जी उत्तर, जी दक्षिण, पी उत्तर, पी दक्षिण, के पूर्व, के पश्चिम

  3. ९ मार्च (सोमवार) – एल, एम वेस्ट, एम ईस्ट, एन, एस, टी


(काही प्रभागांमध्ये बिनविरोध निवडीची शक्यता व्यक्त)


सत्तासमीकरणांचा खेळ- (BMC प्रभाग समित्यांची निवडणूक 2026)



  1. 17 पैकी सुमारे 9 प्रभाग समित्यांवर महायुतीचे वर्चस्व असल्याचा दावा केला जात आहे.

  2. उर्वरित प्रभागांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, मनसे, काँग्रेस, समाजवादी पक्ष यांच्यात चुरस अपेक्षित.

  3. काही ठिकाणी सदस्यसंख्या समसमान असल्याने क्रॉस व्होटिंग किंवा तटस्थ भूमिकेचा प्रभाव पडू शकतो.

  4. 1-2 प्रभागांमध्ये बिनविरोध निवडीची शक्यताही वर्तवली जाते.


का महत्त्वाच्या आहेत प्रभाग समित्या? (BMC Ward Committees Election 2026)



  1. प्रभाग समित्या म्हणजे स्थानिक पातळीवरील निर्णयांचे केंद्र.

  2. रस्ते, पाणी, गटार, स्थानिक विकासकामे यांवरील प्राथमिक नियंत्रण या समित्यांकडे असते.

  3. अध्यक्षपद मिळवणे म्हणजे त्या भागातील प्रशासनावर थेट प्रभाव.


राजकीय प्रतिष्ठेची लढत- (BMC Ward Committees Election 2026)


महापौर निवडीनंतर आता प्रभाग समित्यांमधील ताकद सिद्ध करण्याची वेळ आली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांकडे मिनी जनमत चाचणी म्हणून पाहिले जात आहे. सत्ताधारी आघाडीला आपले संख्याबळ टिकवण्याचे आव्हान असताना, विरोधकांसाठी ही संधी सत्ता समीकरणात बदल घडवून आणण्याची आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस मुंबई महापालिकेच्या राजकारणात चांगलीच रंगत पाहायला मिळणार आहे.


मुंबई महापालिका फायनल निकाल- (BMC Election Result 2026)


भाजप – 89
शिवसेना ठाकरे गट – 65
शिवसेना – 29
काँग्रेस – 24
मनसे – 6
एमआयएम- 8
राष्ट्रवादी-3
एसपी-2
राष्ट्रवादी शप – १
————
227/227


राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:



संबंधित बातमी:


Raj Thackeray MNS Meeting: काल एकनाथ शिंदेंची भेट, आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक; राज ठाकरे म्हणाले, प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट असते!




आणखी वाचा



Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.