नाशिक: उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्याने बाजारात शेतमालाला कमी दर मिळत असून, विशेषतः कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर कांद्याला तातडीने हमीभाव जाहीर करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अन्यथा कृषिमंत्र्यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी दिला.


मका पिकासाठी जाहीर करण्यात आलेल्या किमान आधारभूत किमतीप्रमाणेच कांद्यालाही हमीभाव देऊन तो प्रत्यक्ष बाजारात लागू करणे अत्यावश्यक आहे. बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.


शासनाने बाजार व्यवहारांवर काटेकोर देखरेख ठेवून हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तसेच शेतकऱ्यांचा संपूर्ण माल शासनाने खरेदी करण्याची लेखी हमी द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Pune News: पुण्यातील मुळा नदीला प्रदूषणामुळे फेस; मैलामिश्रित पाणी नदीपात्रात, धक्कादायक वास्तव समोर!

बाजारभाव आणि हमीभावातील तफावत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणारी ‘भावांतर योजना’ तातडीने लागू करावी, कांद्यावरील निर्यात निर्बंध हटवून जागतिक बाजारपेठ खुली करावी आणि साठेबाज व दलालांविरोधात कठोर कारवाई करावी, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.


यासोबतच गायीच्या दुधाला किमान ४० रुपये व म्हशीच्या दुधाला ५० रुपये प्रतिलिटर हमीभाव जाहीर करावा. तसेच प्रतिलिटर किमान दहा रुपये अतिरिक्त अनुदान द्यावे, अशी मागणीही संघटनेने केली आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.