घाटकोपरमधील असल्फा येथे काही युवक तलवारी घेऊन फिरत असण्याचा सीसीटीव्ही समोर

घाटकोपर मधील असल्फा येथे काही युवक तलवारी घेऊन फिरत असण्याचा सीसीटीव्ही समोर


सकाळच्या सुमारास दोन युवक हातात तलवारी घेऊन असल्फा विभागात फिरत


किरकोळ वादावरून समोर आला मारण्यासाठी दोन विभाग तलवारी घेऊन फिरत असल्याचा व्हिडिओ समोर


आरोपी अद्यापही फरार असून घाटकोपर पोलीस घेत आहेत शोध

केरळमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा निवडणूक आयोगाने घेतला

केरळमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा निवडणूक आयोगाने घेतला आहे.

Mumbai News: महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे चेंबूरमध्ये दाखल

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे चेंबूर मध्ये दाखल


छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आम्ही ठाकरे मधील 152 वॉर्डमध्ये दाखल

Pune Live: सहा पदरी उड्डाणपुलासाठी अर्थसंकल्पात ५,२६२ कोटींची तरतूद

हडपसर-यवत सहा पदरी उड्डाणपुलासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ५,२६२ कोटींची तरतूद झाल्याची माहिती दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दिली. शुक्रवार दि. ६ रोजी झालेल्या अर्थसंकल्पात निधी मंजुरीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा केली आहे. या निर्णयाचे दौंड तालुक्यातील ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ३ कामगार ठार

करमाड: मुंबई–नागपूर समृद्धी महामार्गावर दुरुस्तीचे काम करत असलेल्या पथकातील कामगारांना भरधाव कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (ता. ६) दुपारी सुमारे १ वाजता चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडखा–नाथनगर शिवारात, चॅनल क्रमांक ४०६ जवळ घडली.या अपघातात राहुल रामगीरी (वय २७, रा. परतूर, जि. जालना), विश्वेश्वर विश्वकर्मा (वय ३२, रा. मध्य प्रदेश) आणि गणेश सांडू कसारे (वय २७, रा. भिकापूर, ता. छत्रपती संभाजीनगर) हे जागीच ठार झाले. तर रामगोपाल रामपटेल (वय ३७, रा. मध्य प्रदेश), ज्ञानेश्वर सोमीनाथ घोरपडे (वय २७, रा. पोखरी, ता. छत्रपती संभाजीनगर) आणि शैलेन्द्र रॉय (मेंटेनन्स वाहन चालक) हे गंभीर जखमी झाले आहेत.

Pune Live: बुधवार पेठेत देहविक्री व्यवसायावर पोलिसांचा छापा

पुणे: बुधवार पेठेतील जनता बिल्डिंगमध्ये सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायावर फरासखाना पोलिसांनी छापा टाकून चार बांगलादेशी महिलांची सुटका केली. नोकरीच्या आमिषाने भारतात आणून त्यांना जबरदस्तीने देहविक्री करण्यास भाग पाडल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे.

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी लागू

पुणेः अंगणवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी आणि अर्धवेळ परिचारिका आदी विविध नावांनी सरकारच्या विविध योजनांमध्ये काम करणाऱ्या सुमारे ९,०१५ कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) आणि पेन्शन योजना लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निकाल प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त अमित वशिष्ठ यांनी दिला आहे. या निर्णयानुसार, पुणे जिल्हा परिषदेने कर्मचाऱ्यांचे आणि नियुक्त्याचे योगदान मिळून जवळपास १०८४ कोटी १३ लाख रुपये येत्या ६० दिवसांत जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

Baldapur Live: बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई

उल्हासनगर मधील एका सोनोग्राफी सेंटर मधून सोनल गरेवाल हिला पोलिसांनी अटक करण्यात आली होती. कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण असताना देखील सोनोग्राफी सेंटरची मशीन हाताळत होती. सोनोग्राफीसाठी आलेल्या महिलांचे ३० सेकंदांचे व्हिडिओ बनवून टोळीला पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. संबंधित सेंटरचा परवाना रद्द करून सील करण्यात आले, उल्हासनगर आरोग्य अधिकाऱ्यांनी या सोनोग्राफी सेंटरमध्ये पहाणी केले असता हे धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Agra Live: आग्य्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक

पानीपतमध्ये मराठा भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी तिथल्या राज्य सरकारशी बोलणी सुरू आहे. तर आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक उभारल्या जाणार आहे. क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जन्माला दोनशे वर्ष पूर्ण होत असल्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

Nashik Live: दूषित पाण्याच्या प्रश्नावर नगरसेवक आक्रमक

नाशिकमधील सातपूर परिसरातील दूषित पाण्याच्या प्रश्नावर नगरसेवक आक्रमक झाले आहेत. बाटलीत आणलेले दूषित पाण्याचा घ्यायला लावला वास. सातपूर परिसरातील नगरसेवक समाधान देवरे यांनी बाटलीत आणले होते दूषित पाणी

Jalgaon News: मुक्ताईनगरमध्ये महामार्गावर भूसंपादनाच्या बाधीत शेतकऱ्यांचे लोटांगण आंदोलन

मुक्ताईनगरमध्ये इंदोर महामार्गावर भूसंपादनाच्या बांधीत शेतकऱ्यांचा महामार्गावरच लोटांगण आंदोलन


लोटांगण आंदोलन करत शेतकरी झाले आक्रमक....


भूसंपादनाचा योग्य मोबदला द्या आम्ही जमिनी द्यायला तयार शेतकऱ्यांची भूमिका.....


महामार्गावर एक तास पाच किलोमीटर पर्यंत वाहतुकीच्या लांबच लांब रांगा वाहतुकीचा खोळंबा....


मोठ्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरले आणि सरकारचा निषेध नोंदवला मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी

Ratnagiri News: रत्नागिरी-खेडच्या लोटे MIDCतील कंपनीत स्फोट

डॉक्टर खान कंपनीत भीषण स्फोट, ११ जण जखमी


रत्नागिरी-खेडच्या लोटे एमआयडीसीतील कंपनीत स्फोट

Mumbai News: होकर्स युनियनतर्फे आझाद मैदानात १२ मार्चला आंदोलन होणार

येत्या १२ तारखेला होकर्स युनियनतर्फे आझाद मैदान येथे आंदोलन होणार, आणि मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे


एकीकडे भाजपाच्या वतीने ‘बांगलादेशी मुक्त फेरीवाले’ अभियान राबवले जात असताना, मुलुंडमध्ये एकही बांगलादेशी फेरीवाला नसल्याचा दावा करत आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते तथा मुंबई काँग्रेसचे महासचिव राकेश शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने फेरीवाल्यांनी मुलुंडमधील टी वॉर्ड कार्यालयावर धडक दिली.

Live : ‘महाविस्तार-AI’ उपक्रमातून शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाधारित स्मार्ट मार्गदर्शन

अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ मध्ये अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. ‘महाविस्तार-AI’ या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या बोलीभाषेत पिकांनुसार मार्गदर्शन, अचूक हवामान अंदाज, किड-रोग व्यवस्थापन तसेच बाजारभाव आणि बाजारपेठेची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे ३० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार आहे.


यासोबतच आदिवासी शेतकऱ्यांसाठी देहवाली भिल्लीसह इतर आदिवासी भाषांचाही समावेश करण्यात येणार आहे. स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांना ‘वसुधा’ दूरध्वनी सेवेद्वारे शेतीसंबंधी मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Nagpur Live : नागपूरला मिळणार नवे व्यापार-वित्तीय केंद्र; ‘नवीन नागपूर’ प्रकल्पाला गती

नागपूर शहराच्या आर्थिक प्रगतीला चालना देण्यासाठी ‘नवीन नागपूर’ या नावाने व्यापार आणि वित्तीय केंद्र विकसित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. शहराचा विस्तार आणि विकास अधिक वेगाने होण्यासाठी नागपूर रिंगरोड प्रकल्पालाही मान्यता देण्यात आली आहे.

Live : महाराष्ट्रातील ५ ज्योतिर्लिंगांच्या विकासासाठी ५ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती

देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य सरकारने भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांवर नियमित आढावा घेणे, समन्वय साधणे आणि कामांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सोपवली आहे. 

लातूर, बारामती आणि अमरावती विमानतळावर रात्रीच्या उड्डाणांसाठी सुविधा करणार - मुख्यमंत्री

पुरंदर-पुणे विमानतळासाठी विशेष प्राधिकरण, भूसंपादन अंतिम टप्प्यात


गडचिरोली विमानतळासाठी भूसंपादन


लातूर, बारामती आणि अमरावती विमानतळावर रात्रीच्या उड्डाणांसाठी सुविधा


शिर्डी, नाशिका, संभाजीनगर, अमरावती, अकोला, रत्नागिरी, यवतमाळ, कराड विमान विस्तारीकरण करणार अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली

Mumbai Live : तिसरी मुंबई म्हणून उरण या परिसरात विकास होतील-मुख्यमंत्री फडणवीस

  • राज्यात शहरी विकास ७० टक्के लोकसंख्या होणार आहे


  • त्यामुळे शहरी सेवा डिजीटल करणार आहे


  • मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन तीन स्थानकांचं २०२७ पर्यंत पूर्ण हेईल


  • तिसरी मुंबई म्हणून उरण या परिसरात विकास होतील


  • तिसरी मुंबईत रायगड पेण व नवी मुंबई विमानतळ ही ग्रीन फिल्ड म्हणून विकसित करणार


शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांची विधानसभेत महत्त्वाची घोषणा

३० सप्टेंपर्यंत थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्ज माफीची घोषणा मुख्यमंत्र्यांची विधानसभेत केली.

Mumbai live : बुलेट ट्रेनच्या स्थानकांची कामे २०२७ पर्यंत पूर्ण होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बुलेट ट्रेनच्या स्थानकांची कामे २०२७ पर्यंत पूर्ण होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Liveupdate: संत गाडगे बाबा तीर्थ क्षेत्र सर्किट विकसित करण्यात येईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महात्मा फुले यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल. संत गाडगे बाबा तीर्थ क्षेत्र सर्किट विकसित केले जाईल. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 24 मार्च रोजी होणार

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 24 मार्च रोजी होणार


सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 24 मार्च.


डिजिटल इलेक्ट्रॉनिक पुरावे आरोपी पक्षाला देण्यात यावेत..


कोर्टाच्या सरकारी पक्षाला सूचना

इराण युद्धाचा पाकिस्तानला तगडा झटका

इराण युद्धाचा पाकिस्तानला तगडा झटका


इराण युद्धाचा पाकिस्तानला दणका बसला आहे.


३ दिवसांपासून इंधन पुरवठा बंद; पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा


अमेरिका इराण युद्धामुळे जगात तेलाचा तुटवडा पडला आहे.


पाकिस्तानमध्ये आता पेट्रोल आणि डिझेलचा फक्त तीन दिवसांचा साठा शिल्लक राहिल्याची माहिती समोर आली आहे.

वी के सिंग यांना सी आय डी कडून खास पाहुणचार?

वी के सिंग यांना सी आय डी कडून खास पाहुणचार?


चौकशीदरम्यान सी आय डी अधिकाऱ्यांसोबत क्रिकेट मॅच बघत असल्याच्या चर्चा


व्हीएसआर कंपनीच्या मालकांची शाही बडदास्त ठेवल्याप्रकरणी रोहित पवार आक्रमक


सकाळी ११ वाजता सुरू झालेली चौकशी संध्याकाळी ७.३० वाजता संपली


संध्याकाळी भारत विरुद्ध इंग्लंडच्या सामन्याच्या काही भाग सिंग यांनी सी आय डी अधिकाऱ्यांसोबत बघितल्याची चर्चा


चार वाजता सीआयडी मुख्यालयात येऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना रोहित पवार विचारणार जाब

Kolhapur Live : कोल्हापुरात सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी १० हजारांची लाच; उपसरपंच आणि ग्राम महसूल अधिकारी रंगेहात पकडलं

कोल्हापुरात सातबाऱ्यावर वडिलांचे नाव लावून देण्यासाठी तब्बल दहा हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उपसरपंच आणि ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Pune Live : ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेत फिर्यादीला शिवीगाळ केल्याचा आरोप

ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल


पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये वसंत मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल


पत्रकार परिषदेत फिर्यादीला शिवीगाळ केल्याचा आरोप वसंत मोरे यांच्या विरोधात करत करण्यात आला गुन्हा दाखल

Buldhana Live : बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव एमआरआय मशीन लोकार्पणाच्या प्रतीक्षेत; रुग्णांना आर्थिक फटका

बुलढाणा जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना एमआरआय तपासणीसाठी दिलासा मिळावा या अनुषंगाने बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जिल्ह्यातील एकमेव एमआरआय मशीन उपलब्ध झाली आहे, जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र इमारतीमध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने सुसज्ज अशी एमआरआय मशीन गेल्या आठ महिन्यापासून कार्यान्वित करण्यात आली आहे, मात्र केवळ तांत्रिक अडचणी सांगत शासकीय प्रक्रियेत या मशीनचे लोकार्पण अडकले आहे.. आजही तपासणीसाठी मशीन पूर्णपणे सज्ज आहे, केवळ शासनाच्या दिरंगाईमुळे सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक फटका सोसावा लागतोय.. 

Chaar Dhaam Yatra Live : चार धाम यात्रेसाठी नोंदणी आजपासून सुरू

गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ यात्रेसाठी ऑनलाइन नोंदणी आजपासून सुरू झाली आहे.

Nagpur Live : नागपूर येथील दारुगोळा कारखान्यातील स्फोटातील मृतांची संख्या २० वर पोहोचली

रविवारी सकाळी नागपूरमधील रौलगाव येथील स्फोटकांच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात १९ कामगारांचा मृत्यू झाला होता तर २४ जण जखमी झाले होत मात्र. आज सकाळी जखमीमधील आणखी एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

Nagpur Live: नारपुरमध्ये बारावीच्या पेपरफुटी प्रकरणात आणखी एक गुन्हा दाखल

राज्यभर गाजलेल्या बारावी पेपरफुटी प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाला असून उमरेड कनेक्शन समोर आले आहे. उमरेडमधील शिकवणी वर्ग संचालक डॉ. अतुल चौधरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या क्लासमध्ये ८ वी ते १२ वीपर्यंत सुमारे १७५ विद्यार्थी शिकतात. २६ जानेवारीला घेतलेल्या सराव परीक्षेतील रसायनशास्त्राचा पेपर आणि बोर्डाच्या पेपरमध्ये ५० टक्क्यांहून अधिक प्रश्न व क्रम जुळल्याने संशय बळावला. बोर्डाच्या तक्रारीवरून उमरेड पोलिसांनी गुन्हा दाखल करून मोबाईल CDRच्या आधारे पेपर कुणाकडून मिळाला याचा तपास सुरू केला आहे.

Chh. Sambhajinagar Live: छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणीपुरवठ्यावर टांगती तलवार

छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणीपुरवठ्यावर सध्या अनिश्चिततेचे सावट आहे. पाटबंधारे विभागाने महापालिकेला ६४ कोटी रुपयांची थकबाकी तत्काळ भरण्याची नोटीस दिली असून, अन्यथा १६ मार्चपासून शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे.


३१ मार्चपूर्वी सिंचन आणि बिगर सिंचन पाणीपट्टीची वसुली वाढवण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मनपाला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी महापालिकेला नोटीस बजावून १५ मार्चपर्यंत एकरकमी ६४ कोटी ९७ लाख रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत.


पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. या पाण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून दरमहा पाणीपट्टीचे बिल महापालिकेला दिले जाते. मात्र, महापालिका प्रशासनाकडून ही बिले वेळेवर भरली जात नसल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.

उद्धव ठाकरे शिवसेनेच्या जिल्हा परिषद गटनेते पदी विक्रांत जाधव यांची निवड

उद्धव ठाकरे शिवसेनेच्या जिल्हा परिषद गटनेते पदी विक्रांत जाधव यांची निवड


उद्धव ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधव यांचे चिरंजीव विक्रांत जाधव


विक्रांत जाधव यांच्या गटनेतेपदी निवड झाल्याचे पत्र जिल्हाधिकारी यांना


रत्नागिरी जिल्हा परिषद मध्ये उद्धव ठाकरे सेनेचे जिल्हा परिषद गटातून चार उमेदवार झाले होते विजयी


गुहागर तालुक्यातील असगोली जिल्हा परिषद गटातून विक्रांत जाधव झाले होते विजयी


विक्रांत जाधव यांना जिल्हा परिषद मध्ये विरोधी पक्षनेते पद मिळण्याची शक्यता

Latur News : मुरुडमध्ये अवैध देशी दारूवर पोलिसांच्या धाडी; लाखो रुपयाचा मद्य साठा जप्त

लातूर जिल्ह्यातील वाढत चाललेल्या अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. लातूरच्या मुरुड परिसरात अवैद्य धंदे, अवैध दारूविक्री यावर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीसह 2 लाख 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Jishnu Dev Varma : तेलंगणाचे विद्यमान राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी रात्री एकाच वेळी अनेक राज्यांतील राज्यपालांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. या निर्णयात महाराष्ट्रासाठी महत्त्वाची बदल झाला. तेलंगणाचे विद्यमान राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिवप्रताप शुक्ला यांना तेलंगणाचे राज्यपाल म्हणून पाठवण्यात आले. ही सर्व नियुक्ती राष्ट्रपती भवनाकडून रात्री उशिरा प्रसिद्ध करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.

Chhatrapati Shivaji Maharaj statue : मोडनिंबमध्ये मध्यरात्री उभारला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा

मोडनिंब (सोलापूर) : मोडनिंब (ता. माढा) ग्रामपंचायत कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आज (दि. ६) रोजी पहाटे उभारण्यात (Chhatrapati Shivaji Maharaj statue installed in Modnimb) आला. अचानक पहाटेच्या सुमारास हा पुतळा उभारल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

Satara News : पाचगणी-करहर मुख्य रस्त्यावर असलेल्या महू धरणाजवळ ट्रक उलटला

पाचगणी : पाचगणी-करहर मुख्य रस्त्यावर असलेल्या महू धरणाच्या भिंतीजवळील धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने एक ट्रक पलटी झाला. काल रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास ही घटना घडली असून, यामध्ये ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, तर चालक किरकोळ जखमी झाला आहे.

Scholarship Exam : शिष्यवृत्ती परीक्षा नोंदणीसाठी आज अंतिम मुदतवाढ

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिलला राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी शाळा नोंदणी आणि विद्यार्थ्यांचे नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शुक्रवारपर्यंत (ता. ६) अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली आहे.

Maharashtra Budget 2026 : राज्याचा अर्थसंकल्प आज विधीमंडळात; कोणत्या घोषणा होणार?

Latest Marathi Live Updates 6 March 2026 : राज्याचा अर्थसंकल्प आज, शुक्रवारी विधिमंडळात सादर केला जाणार आहे. राजकीय कारकिर्दीत Devendra Fadnavis हे दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर फडणवीस यांनी वित्त खात्याची जबाबदारी स्वतःकडे घेतली होती. वर्ष २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री फडणवीस ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतील लाभाची रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्यात येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच राज्य सरकारच्या इतर महत्त्वाच्या योजनांसाठी किती निधीची तरतूद केली जाणार, याबाबतही उत्सुकता वाढली आहे. याशिवाय देश-राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, वाहतूक कोंडी, राजकीय हालचाली, क्रीडा, मनोरंजन आणि मान्सूनविषयक अपडेट्स यांची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.