शेअर बाजार बातम्या मराठी : इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाल्याचं दिसून येतंय. आठवड्याच्या पहिल्या दिवशीच बाजारात मोठी घसरण झाली असून एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे 8.49 लाख कोटी रुपये पाण्यात गेले. दिवसाअखेर सेन्सेक्स 1,352.74 अंकांनी म्हणजे 1.71 टक्क्यांनी घसरून 77,566.16 वर बंद झाला. तर निफ्टी 422.40 अंकांनी म्हणजे 1.73 टक्क्यांनी घसरून 24,028.05 वर बंद झाला. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि पश्चिम आशियात वाढलेला भू-राजकीय तणाव यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.


जागतिक घडामोडींचा परिणाम


इराण-इस्त्रायल युद्धामुळे जागतिक बाजारातून मिळालेले नकारात्मक संकेत आणि रुपयाने गाठलेला नवा नीचांक यामुळेही गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास डळमळीत झाला. त्यामुळे बाजारात सर्वत्र विक्रीचा जोर दिसून आला. मात्र शेवटच्या तासात खालच्या स्तरांवर काही खरेदी झाल्याने बाजारात थोडीशी सुधारणा झाली.


सर्व सेक्टरमध्ये घसरण


सोमवारी जवळपास सर्वच सेक्टोरल निर्देशांक घसरणीसह बंद झाले. ऑटो, कॅपिटल गुड्स, कंझ्युमर ड्युरेबल्स, मेटल, पीएसयू बँक, ऑइल अँड गॅस आणि प्रायव्हेट बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये 2 ते 4 टक्क्यांपर्यंत घसरण झाली. याशिवाय निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही सुमारे 2 टक्क्यांनी घसरले.


गुंतवणूकदारांचे 8.49 लाख कोटींचे नुकसान


बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन 441.19 लाख कोटी रुपयांवर आले. याआधीच्या व्यवहार दिवशी हे 449.68 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 8.49 लाख कोटींची घट झाली.


सेन्सेक्समधील टॉप घसरलेले शेअर्स


सेन्सेक्समधील 30 पैकी 25 शेअर्स घसरणीसह बंद झाले.


सर्वाधिक घसरण झालेल्या शेअर्समध्ये:



  • अल्ट्राटेक सिमेंट  – 5.23% घसरण

  • मारुती सुझुकी – सुमारे 4% घसरण

  • महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) – 4% पेक्षा जास्त घसरण

  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) – सुमारे 4% घसरण

  • इंडिगो – सुमारे 3.8% घसरण


या शेअर्समध्ये दिसली तेजी


घसरत्या बाजारातही काही शेअर्समध्ये वाढ दिसून आली.


तेजीत बंद झालेले प्रमुख शेअर्स:



  • रिलायन्स इंडस्ट्रीज – 1.37% वाढ

  • सन फार्मा

  • इन्फोसिस

  • टेक महिंद्रा

  • एचसीएल टेक


या शेअर्समध्ये 0.13% ते 0.48% पर्यंत वाढझाली.


4,536 शेअर्समध्ये व्यवहार


सोमवारी बीएसईवर एकूण 4,536 शेअर्समध्ये व्यवहार झाला. त्यापैकी 972 शेअर्स वाढीसह बंद झाले. 3,379 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर 185 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. याशिवाय 72 शेअर्सनी 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, तर 875 शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी स्तरावर आले.


ही बातमी वाचा:




आणखी वाचा



Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.