सरकारच्या नव्या नियमानुसार विद्यार्थाच्या निवास स्थानापासून 1 किलोमीटर परिसरातील शाळाच निवडता येत होती. सरकारच्या या निर्णयाला ऍड. बोधी रामटेके आणि एड दीपक चटप यांनी आव्हान देत नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.
Kolhapur Live: कोल्हापूरमध्ये कोर्टातच वकिलाला मारहाणकोल्हापुरातील जिल्हा सत्र न्यायालय परिसरात महिला वकिलाला मारहाण झाल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल कोल्हापूर सर्किट बेंचने घेतली आहे. कौटुंबिक वादाच्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान संबंधित महिलेने महिला वकिलाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली होती. न्यायालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असतानाही ही घटना घडल्याने वकील संघटना आक्रमक झाल्या होत्या.
Akola Live: मनपा सभागृहात पत्रकारांना येण्यास मज्जाव, गवईंनी विचारला जाबअकोला महानगरपालिकेच्या सभागृहात सोमवारी (ता.९) एकामागोमाग झालेल्या तीन महासभांच्या कामकाजावेळी पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आल्याने वाद निर्माण झाला. सभागृहातील घडामोडींचे वृत्तांकन करण्यासाठी पत्रकारांना येण्यास मज्जाव केल्याचा मुद्दा सभेच्या सुरुवातीलाच वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक पराग गवई यांनी उपस्थित केला.
पं.स.सभापतीपदी काँग्रेसच्या सुनिता कोसबे तर उपसभापती वाघमारेजळकोट: पंचायत समितीच्या नवव्या सभापती म्हणून काँग्रेसच्या सुनिता संभाजी कोसबे तर उपसभापती काँग्रेसचे माधव जळबा वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली. पंचायत समितीच्या सभागृहात पिठासीन अधिकारी तहसीलदार राजेश लांडगे व गटविकास अधिकारी नरेंद्र मेडवार यांच्या उपस्थित पंचायत समितीच्या सदस्यांची बैठक झाली.बैठकीत सभापती व उपसभापतीसाठी प्रेतकी एक, एक अर्ज आल्याने पिठासीन अधिकारी राजेश लांडगे यांनी सभापती व उपसभापतीपदाची बिनविरोध निवड झाल्याचे घोषीत केले.पंचायत समितीचे एकुण सहा सदस्य होतो त्यापैकी काँग्रेसचे चार तर राष्टवादीचे दोन सदस्य निवडून आले होते.त्यामुळे काँग्रेसकडे बहुमत असल्याने सभापती व उपसभापती काँग्रेसचे झाले.पुन्हा काँग्रेसने पंचायत समितीवर आपला झेंडा फडकावला आहे.
Pune Live: उरुळी कांचन येथे अपघात, एकाचा मृत्यूउरुळी कांचन: उरुळी कांचन येथे (रविवार व सोमवार) आज रात्री १२.३० चे सुमारास पुणे सोलापूर महामार्गावरील तळवाडी चौकात महामार्ग ओलांडून शिंदवणे रोडवरील आपल्या राहत्या घराकडे निघालेल्या उत्तम बबन भंडारे (वय ५३ वर्ष )यांचा,एमएच १२ एस एक्स ८९८५ ने जोरात धडक देत चाकाखाली चिरडल्याने जागेवर मृत्यू झाल्याची घटना उरुळी कांचन गावच्या यात्रेच्या शेवटच्या दिवशी घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Pune Live : पुणे महापालिकेचे तब्बल 13 हजार कोटींचे अंदाजपत्रकपुणे महानगरपालिकेचे तब्बल 13 हजार कोटींचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. 2026-27 आर्थिक वर्षासाठी हे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar Live : छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस अभावी 5 मोठे उद्योग बंदछत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस अभावी 5 मोठे उद्योग बंद झाले आहे. ऑटो इंडस्ट्री आणि फार्मा कंपनीला गॅस तुटवड्याचा फटका बसला आहे.
Jalgaon Live : आजाराने झाला मृत्यू पण कागदावर दाखवण्यात आला अपघात ; 50 लाखांच्या विम्यासाठी डॉक्टरांचा कटमालेगाव मधील राजेंद्र जाधव यांचा आजाराने मृत्यू झाला असतानाही तो अपघाती असल्याचा बनाव करून पन्नास लाखांचा विमा लाटण्याचा प्रकार उघड झाला आहे. विमा कंपनीच्या तपासात हा कट उघड झाला असून यात डॉक्टर आणि पोलीस कर्मचारी सामील होते.
Vidarbha Live: विदर्भात तापमानाचा पारा वाढला; अकोल्यात सर्वाधिक तापमानअकोला , अमरावती आणि वर्धा जिल्ह्यासाठी तापमानाचा 3 दिवसाचा ऍलो अलर्ट जाहीर
Maval Live:३३ वर्षानंतर मावळ पंचायत समिती वर राष्ट्रवादीचा झेंडा सभापती व उपसभापती पदावर राष्ट्रवादीचे उमेदवार विराजमान....मावळ तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दमदार कामगिरी करत सर्व 15 जागांवर विजय मिळवला आहे. या निकालामुळे भाजपचा मावळमध्ये पूर्णपणे धुव्वा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Pune Live: पुणे शहरातील वाहतूक नियोजन व प्रकल्पासाठी ७४० कोटी रुपयांची तरतूदपुणे महापालिकेसाठी आज महापालिका आयुक्त यांनी सादर केला अर्थसंकल्प
पुणे शहरातील महत्त्वाचे रस्ते, वाहतूक कोंडी कमी करणे तर उड्डाणपूल, नदीवरील पूल, रेल्वे पुलांचे नियोजन
प्रायोगिक तत्त्वावर पुणे शहरातील पाच रस्त्यावर अँड पार्क चे नियोजन
रस्त्यावरील अनाधिकृत पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पे अँड पार्क
पावसाळ्यापूर्वी पुणे शहरातील तीन पुलांचे काम पूर्ण होणार
घोरपडी रेल्वे पूल, आगाखान नदीवरील पूल, सनसिटी कर्वेनगर नदीवरील पूल पूर्ण करण्याचे नियोजन
Pune Live: पुणे जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती, उपसभापतींची निवडी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वर्चस्व१३ पंचायत समित्यांच्या १४६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वाधिक ९० जागांवर विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले आहे.
भाजपचे २८ सदस्य विजयी झाले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) १२, शिवसेना (शिंदे गट)१०,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ४ तर दोन अपक्ष सदस्य निवडून आले आहेत.
आंबेगाव, शिरूर, मावळ, मुळशी, हवेली, पुरंदर, वेल्हे, बारामती आणि इंदापूर पंचायत समितींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट बहुमत आहे.त्यामुळे या ठिकाणी सभापती व उपसभापती पदांवर राष्ट्रवादीचे उमेदवार उमेदवार निवडले.
Buldhana News: बुलढाणा जिल्ह्याचे तापमानाची 38 डिग्रीवर नोंद, नागरिकांची लाहीलाहीबुलडाणा जिल्ह्याचे तापमानाची आज 38 डिग्रीवर नोंद झाली आहे .. जिल्ह्यात जणू काही सूर्य आग ओकत असल्याची परिस्थिती निर्माण झालीय .. यामुळे रस्त्यावर पूर्णतः शुकशुकाट पसरला आहे .. नागरिकांच्या जीवाची लाही लाही होत असल्याने नागरिक थंड पेय मिळेल त्या ठिकाणी जात आहेत .. वाढलेला पारा जिल्हा वासियांना हैराण करुन सोडणारा आहे.. तर मार्च महिना सुरू होऊन आठवडा उलटला , एप्रिल आणि मे महिना यायचा अद्याप बाकी आहे .. मात्र मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच 38 डिग्री तापमान वाढल्याने नागरिक हैराण झाले आहे....
Mumbai News: वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात अपघातात विद्यार्थ्याचा डोळा निकामीवीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात अपघातात विद्यार्थ्याचा डोळा निकामी
Pune News: RTE प्रवेशातील अन्यायकारक नियमाविरोधात पुण्यात मनसेचं आक्रमक आंदोलनRTE प्रवेशातील अन्यायकारक नियमाविरोधात पुण्यात मनसे आक्रमक आंदोलन
सेंट्रल बिल्डिंग शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन
राज्य सरकारने शिक्षण हक्क कायदा (RTE) अंतर्गत प्रवेशासाठी लागू केलेल्या १ किमी अंतराच्या नव्या नियमामुळे अनेक गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे.
या विषयासाठी झोपलेल्या सरकारला आणि शिक्षण मंत्र्यांना जागे करण्यासाठी ' कुंभकर्ण ' आंदोलन.
मनसे विद्यार्थी सेनेचे आंदोलन...
Board Exam Copy Case: दहावी, बारावी परीक्षेतील कॉपी प्रकरणात ८१ जणांचे निलंबनदहावी, बारावी परीक्षेतील एकूण कॉपी प्रकरणात राज्यातील ८१ जणांचे निलंबन
राज्यातील विविध जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचे निलंबन
सी सी टिव्ही यंत्रणेमुळे पुराव्यासह मास कॉपी चे प्रकार आले उघडकीस
बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील परीक्षा केंद्रावर सर्वाधिक १७ कर्मचाऱ्यांचे निलंबन
छत्रपती संभाजीनगर मधील कन्नड तालुक्यातील परीक्षा केंद्रावरील कॉपी प्रकरणात २४ जणांवर गुन्हा दाखल
जालना जिल्ह्यात ५ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई
गडचिरोली जिल्ह्यातील चॅट जी पी टी कॉपी प्रकरणात तीन शिक्षक आणि एका शिपाई वर गुन्हा दाखल असून चार ही जणांचे निलंबन
Chha. Sambhajinagar Live : छत्रपती संभाजीनगर छावणी परिसरात एका घराला अचानकपणे भीषण आगछत्रपती संभाजीनगरच्या छावणी भागातील एका घराला अचानक आग लागली. ही घटना दुपारी घडली. घराच्या तिसऱ्या मजल्यावर मंडपासाठी लागणारे कपडे आणि सजावटीचे साहित्य ठेवले होते, ज्यामुळे आग लागल्यानंतर ती लवकरच मोठ्या प्रमाणात पसरली आणि आगीचे लोट बाहेर येऊ लागले. आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग नियंत्रणात आणली गेली आहे. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Beed Live : बीडच्या जालंदर विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर थेट विद्यार्थ्यांना झेरॉक्स करून कॉपीबीड जिल्ह्यात सध्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत, आणि या परीक्षांमध्ये थेट शिक्षकच उत्तरपत्रिका तयार करून त्याचे झेरॉक्स विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बीडच्या शिरूर तालुक्यातील रायमोह येथील जालंदर विद्यालयात थेट विद्यार्थ्यांना झेरॉक्स कॉपी पुरवल्याचे समोर आले आहे, आणि शिक्षकच विद्यार्थ्यांना कॉपीसाठी प्रोत्साहित करतात. बोर्डाच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता यावी यासाठी प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही बसवले आहेत, परंतु काही काळासाठी सीसीटीव्ही बंद केले जातात. या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Kalyan Live : कल्याणच्या द्वारली पाड्यात गुरचरण जमिनीवर अतिक्रमण, म्हैस घेऊन केडीएमसी आय प्रभाग कार्यालयात नागरिकांचे आंदोलनवाशिम जिल्ह्यातील केकतउमरा गावात शेतात आग लागल्याने उभा गहू जळून खाक झाला आहे. महावितरणच्या तारा शेतातून गेल्यामुळे त्यांच्यातील घर्षणामुळे आग लागली. या आगीत दोन एकर गहू जळून गेला आहे. महावितरणच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. पांडुरंग ढोरे हे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. काही दिवसांत गहू काढणीला येणार होता, परंतु आगीमुळे गहू जळून खाक झाला आहे. शेतकरी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी करत आहेत.
Washim Live : वाशिम जिल्ह्यात विद्युत वाहिनीच्या तारे मधून घर्षण होऊन 2 एकर गहू पिकाची राखरांगोळीवाशिम जिल्ह्यातील केकतउमरा गावात शेतात आग लागल्याने गव्हाचे पीक जळून खाक झाले आहे. महावितरणच्या तारा शेतातून गेल्यामुळे त्यांच्यातील घर्षणामुळे आग लागली. या आगीत दोन एकर गहू जळून गेला आहे. शेतकऱ्यांना महावितरणच्या दुर्लक्षामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. पांडुरंग ढोरे हे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. काही दिवसांत गहू काढणीला येणार होते, परंतु आगीमुळे गहू जळून खाक झाला आहे. शेतकरी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी करत आहेत.
Pune Live: पुणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणारपुणे महानगरपालिकेचा २०२६-२७ आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज स्थायी समितीसमोर सादर होणार असून आयुक्त नवल किशोर राम प्रथमच हा अर्थसंकल्प मांडणार आहेत.
Nashik Live: घरगुती गॅस सिलेंडर पुरवठ्यावर परिणाम नाहीइराण,अमेरिका,इस्रायल यांच्यात होत असलेल्या युध्दा मुळे भारतात आखाती देशातून येणाऱ्या गॅस वर त्याचा परिणाम झाल्याने घरगुती सिलेंडर च्या भावात वाढ झाली आहे तर कमर्शियल गॅस सिलेंडर वर परिणाम झाला असला तरी मनमाड येथील पानेवाडी टर्मिनल येथील गॅस बॉटलींग प्लांट मधून रोज अनेक जिल्ह्यात नियमित सिलेंडर पुरवठा सुरळीत सुरू आहे. सध्या घरगुती गॅस च्या किमतीत वाढ झाली असली तरी परिस्थिती गंभीर झाल्यास त्यात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
T20 WC: टी२० वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचे लोकसभेकडून अभिनंदनटी२० क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे लोकसभेने अभिनंदन केले आहे.
Loksabha Live Updates: लोकसभा कामकाज दुपारी ३ वाजेपर्यंत स्थगितलोकसभा कामकाज दुपारी ३ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.
T20 WC Update: टी२० वर्ल्ड कप विजयाबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांकडून भारतीय संघाचे अभिनंदनटी२० वर्ल्ड कप विजयाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून भारतीय संघाचे अभिनंदन करण्यात आले आहे. त्यांनी असंही सांगितलं की भारतीय संघाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आज विधानसभा आणि विधानपरिषदेत मांडला जाईल.
Kolhapur News : माजी सरपंच २ महिन्यापासून बेपत्ता, पत्नीसह कुटुंबियांचे आंदोलनकोल्हापुरातील पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर गेल्या दोन महिन्यापासून बेपत्ता महेश पिळणकर यांचं झालं तरी काय ? पिळणकर कुटुंबीयांचा सवाल
महेश पिळणकर प्रकरणात पोलीस कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ आज संविधान हक्क संघर्ष समिती कडून निदर्शन
कोल्हापूर मधील दसरा चौकात होत असलेल्या या आंदोलनात बेपत्ता माजी सरपंच महेश पिळणकर यांच्या पत्नी सह कुटुंबीय उपस्थित
Raigad News : मनसेच्या सदस्य नोंदणीची रायगडावरून सुरुवात, राज ठाकरेंची घोषणामहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणीची सुरुवात कऱण्यात आल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगडावर केली. राज ठाकरे म्हणाले की, सदस्य नोंदणीसाठी वर्दळीच्या ठिकाणी स्टॉल लागले पाहिजेत. तुम्ही लोकांना भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे, पक्षाचे सदस्य होण्यासाठी हजारो लोक इच्छुक आहे.
रायगडावर नोंदणीची सुरुवात करतोय. महाराजांचे आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रभर जा. १९ तारखेला गुढीपाडव्याला, महाराष्ट्रातील हितचिंतकांनी शिवतीर्थावर १९ मार्चला यावं असं आवाहन करतो. पहिली सभा १९ मार्चला झाली होती. २० वर्षांनी पुन्हा गुढीपाडव्याच्या सभेला १९ मार्च तारीख आलीय असंही राज ठाकरे म्हणाले.
Pune News : पुण्यात गो रक्षकांकडून तरुणाला मारहाण, शेण खायला लावलंखेड शिवापूर भागात गो रक्षकांकडून तरूणास अमानुष मारहाण
म्हशी घेऊन जाणाऱ्या ट्रक ड्रायवरला पकडून केली मारहाण...
मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मारहाणीदरम्यान तरूणाला शेण खाऊ घातलं
Hingoli Live : हिंगोलीत काँग्रेसची पदयात्रा; शेतकरी, शेतमजूर आणि बेरोजगारीच्या प्रश्नांवर आंदोलनकाँग्रेसने आज हिंगोली मध्ये शेतकरी शेतमजूर आणि बेरोजगारीच्या विरोधात पदयात्रा काढली आहे. कळमनुरी ते हिंगोली असा 18 किलोमीटरचा प्रवास करत ही पदयात्रा सायंकाळी हिंगोली शहरात दाखल होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ , सचिन नाईक,मोहन जोशी यांच्यासह वरिष्ठ काँग्रेस नेते या पदयात्रेत सहभागी झाले आहेत. दरम्यान कळमनुरी शहरातून निघालेल्या या पदयात्रेत शेकडोच्या संख्येने तरुण देखील सहभागी झाले आहेत
Jalna Live : भोकरदन-जाफराबाद तालुक्यातील रस्त्यांसाठी २५ कोटींचा निधी मंजूरजालन्यातील भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातील रस्त्यांसाठी तब्बल 25 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भोकरदन च्या प्रभात मतदारसंघातील चार महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामासाठी हा 25 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.
Sangli Live : विशाल पाटलांनी भाजपावर केलेल्या टिकेवरून पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचा काँग्रेसला टोलासांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी भाजपावर केलेल्या टिकेवरून पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी काँग्रेसला टोला लगावाल आहे.11 जिल्हा परिषद सदस्यांवर काँग्रेसला जिल्हा परिषद अध्यक्ष पद मिळवता आला,तर मग त्यांचा विजय झाला,असं म्हणता येईल,अशा शब्दात मंत्री पाटील यांनी विशाल पाटलांना टोला लगावलाय.
Kolhapur News : मणेर मळा येथे रिक्षाचालकाचा दगडाने ठेचून खूनगांधीनगर : उचगाव (ता. करवीर) पैकी मणेर मळा येथे रिक्षाचालकाचा काल रात्री दगडाने ठेचून खून झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. प्रशांत बाबूराव पंडित (वय ४०) असे त्याचे नांव असून खुनाचे कारण अजून समजले नाही.
Bangalore News : सायबर गुन्हे रोखण्यासाठी कडक पावले उचलणार; गृहमंत्री परमेश्वरबंगळूर : सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने कडक उपाययोजना केल्या असून, कर्नाटक जगातील सर्वात सुरक्षित डिजिटल व्यवस्था असलेल्या राज्यांपैकी एक असल्याचे राज्याचे गृहमंत्री जी परमेश्वर यांनी शनिवारी सांगितले. शहरात सीआयडी आणि सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरतर्फे आयोजित तिसऱ्या वार्षिक सायबर गुन्हे तपास शिखर परिषदेचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
Balen Shah : नेपाळमध्ये बालेन शाह यांचा निवडणुकीत विजयकाठमांडू : बालेन शाह यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने (आरएसपी) नेपाळच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रचंड विजय मिळविला असून, पारंपरिक राजकीय पक्षांना पराभवाचा धक्का दिला आहे. रवी लामिछाने यांनी सन २०२२ मध्ये स्थापन केलेल्या ‘आरएसपी’ने प्रतिनिधी सभेतील १६५ थेट निवडणूक जागांपैकी १२० जागा जिंकल्या असून, आठ जागांवर आघाडी घेतली आहे, असे निवडणूक आयोगाने रविवारी सांगितले. नेपाळ सार्वत्रिक निवडणुकीमध्ये १५२ जागांचे निकाल जाहीर झाले असून, नेपाळ काँग्रेस १७ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील ‘सीपीएन’ला फक्त सात जागा मिळाल्या असून, तीन ठिकाणी आघाडी आहे.
Latur News : लातूरमध्ये 10 पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाची आज होणार निवडलातूर जिल्ह्यात दहा पंचायत समिती असून आज दुपारी या पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडी होणार आहेत. जिल्ह्यातील लातूर आणि जळकोट पंचायत समितीत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्याने या ठिकाणी काँग्रेसचा सभापती होणार आहे. तर, औसा, निलंगा आणि देवणी या पंचायत समितीवर भाजपाचे वर्चस्व निर्माण झाल्याने भाजपाचा सभापती होणार आहे. चाकूर उदगीर आणि अहमदपूरचे सूत्र हे राष्ट्रवादीकडे असल्याने या ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता येणार आहे. मात्र रेनापूर आणि शिरूर आंतपाळ या ठिकाणी सर्वांचे लक्ष लागले आहे.
Kolhapur News : कळंबा तलावात तरुण बुडाला; रंगपंचमीनंतर अंघोळीवेळी घटनाकळंबा : कळंबा तलावामध्ये परप्रांतीय तरुण बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. राजदीप नारायण साहा (वय ३०, सध्या रा. निकम गल्ली, कळंबा; मूळ गाव पटना, बिहार) असे त्यांचे नाव आहे. रंगपंचमी खेळून झाल्यानंतर राजदीप तलावामध्ये अंघोळीसाठी सायंकाळी चारच्या सुमारास गेले होते. सांडव्याजवळील काठावरून त्यांनी तलावामध्ये सूर मारला. मात्र, पोहोताना दम लागल्यामुळे तो बुडाला असल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी यावेळी दिली.
Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतींच्या उद्या निवडीकोल्हापूर : जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील पंचायत समिती सभापतींच्या निवडी उद्या (ता. १०) होणार आहेत. त्या त्या तालुक्याच्या तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या नवनिर्वाचित सदस्यांच्या पहिल्या बैठकीत या निवडी होतील. शाहूवाडी वगळता बहुतांशी ठिकाणी या निवडी बिनविरोध होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शाहूवाडी पंचायत समितीत जनसुराज्य शक्ती व शिवसेना ठाकरे-राष्ट्रवादी आघाडीला प्रत्येकी चार जागा मिळाल्याने या तालुक्यातील निर्णय चिठ्ठीवर होण्याची शक्यता आहे.
Bangalore Police : ज्यु. एनटीआरना पाहण्यासाठी गर्दी; बंगळुरात पोलिसांचा सौम्य लाठीचार्जबंगळूर : खासगी कार्यक्रमासाठी शहरात आलेले दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेते ज्युनिअर एनटीआर यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणली. महादेवपूर येथील नव्याने उभारण्यात आलेल्या किम्स सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी ज्युनिअर एनटीआर उपस्थित होते. आपल्या आवडत्या अभिनेत्याला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते रुग्णालयाच्या परिसरात जमले आणि काहीजण आत घुसले. यावेळी मोठी रेटारेटी झाली. गोंधळाच्या परिस्थितीत रुग्णालयातील एस्कलेटरही तुटल्याची माहिती मिळाली. हजारोच्या संख्येने जमलेल्या चाहत्यांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून जमाव पांगवला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
Bavdhan Bagad Procession : साताऱ्यात बावधनला बगाडाची मिरवणूक उत्साहातबावधन : ‘काशिनाथाच्या नावानं चांगभलं’च्या गजरात ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या बगाडाची मिरवणूक हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात, शांततेत झाली. कृष्णातीरावरील सोनेश्वर येथून सकाळी साडेबाराच्या सुमारास बगाड मिरवणुकीस प्रारंभ झाला. त्यापूर्वी त्यास नदीत स्नान घालून देवदेवतांची पूजा- आरती करण्यात आली. त्यानंतर बगाड्यास पारंपरिक पोशाख घालून झोपाळ्यावर चढविले. बगाड म्हणजे दोन मोठी दगडी चाके असलेला त्यावर सुमारे ४० फुटाच्या उंचीच्या शिडावर झोपाळ्याच्या साह्याने बगाड्यास चढविण्यात येते. यावर्षी हा मान गावातील विठ्ठल सोपान कदम (वय ४८) यांना मिळाला. एका वेळी १० ते १२ बैलजोड्यांच्या साह्याने हा रथ ओढण्यात येतो.
Panchgani Bandh : रखडलेल्या महामार्गाच्या निषेधार्थ पाचगणीत बंदपाचगणी : सुरूर-पोलादपूर महामार्गाच्या रस्ते कामात होणाऱ्या दिरंगाईचा निषेध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला व्यापारी, नागरिक आणि विविध संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळपासूनच शहरातील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला, तर गुरेघर, तायघाट आणि भोसे परिसरातील व्यापाऱ्यांनीही आपली दुकाने कडकडीत बंद ठेवून या आंदोलनात आपला सहभाग नोंदवला.
Kolhapur News : भाजप- राष्ट्रवादीच्या नेत्यांची उद्या बैठक, मुंबईत होणार खलबतेकोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या नव्या सभागृहातील पहिला अध्यक्ष कोणाचा, याचा निर्णय मंगळवारी (ता. १०) होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे वरिष्ठ नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय होईल. त्यासाठीची खलबते आता मुंबईत होणार आहेत. १७ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी होणार आहेत.
MNS 20th Anniversary : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विसावा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडावर दाखलमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) विसावा वर्धापन दिन आज 9 मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या महत्त्वपूर्ण सोहळ्यासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पोहोचले आहेत. मनसेचा यंदाचा वर्धापन दिन छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाच्या पायथ्याशी आयोजित करण्यात आला आहे, ज्यामुळे या कार्यक्रमाला ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
Balumama Bhandara Festival : आदमापुरात आजपासून बाळूमामांचा भंडारा उत्सवगारगोटी : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला आदमापूर (ता. भुदरगड) येथील बाळूमामांचा वार्षिक भंडारा उत्सव ९ ते १७ मार्चअखेर होत आहे. सोमवारी (ता. ९) सायंकाळी सात वाजता धैर्यशील भोसले यांच्या हस्ते वीणापूजन होऊन सप्ताहास प्रांरभ होईल.
T20 World Cup : टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारत सलग दुसऱ्यांदा जेताLatest Marathi Live Updates 9 March 2026 : ‘इतिहास बदलणार आणि इतिहास रचणार’... हे एका जाहिरातीतील रोहित शर्माच्या तोंडचे वाक्य तंतोतंत खरे ठरविताना सूर्यकुमारच्या भारतीय संघाने टी-२० विश्वकरंडक दिमाखात जिंकत नवा इतिहास घडविला. टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत न्यूझीलंडला कधीही पराभूत न केलेल्या भारताने आजच्या अंतिम सामन्यात मात्र त्यांना पाणी पाजले आणि ९६ धावांच्या विजयासह दरारा सिद्ध केला. याशिवाय देश-राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, वाहतूक कोंडी, राजकीय हालचाली, क्रीडा, मनोरंजन आणि मान्सूनविषयक अपडेट्स यांची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.