टी-२० वर्ल्ड कप २०२६ संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’ची घोषणा केली आहे. या संघात भारताच्या चार खेळाडूंना स्थान मिळाले आहे. मात्र विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार सूर्यकुमार यादव याला या संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे क्रिकेटवर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहं.
आयसीसीने जाहीर केलेल्या संघात पाकिस्तानच्या एका खेळाडूचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच अमेरिकेच्या शॅडले व्हॅन शाल्कविक यालाही या संघात संधी देण्यात आली आहे. असोसिएट देशांमधून या संघात स्थान मिळवणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे.
T20 World Cup, IND vs USA: संजू सॅमसनला वगळलं, बुमराहचाही समावेश नाही; सिराजचे पुनरागमन; कशी आहे भारताची प्लेइंग इलेव्हनआयसीसीने या संघाचे नेतृत्व दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम याच्याकडे सोपवले आहे. मार्करमने स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाजी करत आपल्या संघाला उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांचा संघ उपांत्य फेरीत पराभूत होऊन बाहेर पडला असला, तरी आयसीसीने त्यालाच ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’चा कर्णधार म्हणून निवडले आहे.
भारताकडून संजू सॅमसन आणि जसप्रीत बुमराह यांच्यासह हार्दिक पंड्या आणि इशान किशन या एकूण चार खेळाडूंना या संघात स्थान मिळाले आहे. यष्टीरक्षक म्हणून इशान किशन ऐवजी संजू सॅमसनची निवड करण्यात आली आहे.
IND vs ENG : अभिषेकला बाकावर बसवणार, रिंकू सिंगला खेळवणार! इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीत भारताची Playing XI अशी असणार आयसीसीची ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’ :साहिबजादा फरहान, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), ईशान किशन, एडन मार्करम (कर्णधार), हार्दिक पंड्या, विल जॅक्स, जेसन होल्डर, जसप्रीत बुमराह, लुंगी एन्गिडी, आदिल रशीद, ब्लेसिंग मुजरबानी, शॅडले व्हॅन शाल्कविक (१२वा खेळाडू).
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.