UPSC Exam : देशातील प्रशासकीय अधिकारी घडवणारी अत्यंत प्रतिष्ठीत आणि अवघड समजली जाणारी स्पर्धात्मक परीक्षा म्हणजे केंद्रीय लोक सेवा आयोगाची परीक्षा अर्थात युपीएससी. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये एकाच नावाच्या दोन महिला उमेदवारांनी ही परीक्षा पास केली. विशेष म्हणजे दोघींना एकसारखेच गुण मिळाले, त्यांची रँकही सारखीच त्यामुळं दोघींनी सेलिब्रेशनही दणक्यात केलं. पण यामुळं गोंधळ निर्माण झाला, दोघींनीही आपणच पास झाल्याचा दावा केला, यामुळं युपीएससी कोंडीत सापडलं. कारण ही घोडचूक नेमकी कशी झाली? याचा विचार सुरु असताना आता या गोंधळावर युपीएससीनंच स्पष्टीकरण दिलं आहे.
SC Hand Book: "प्रभावशाली जातींच्या पुरुषांनी लैंगिक हिंसाचाराला टूल म्हणून वापरलं"; माजी CJI चंद्रचूड यांनी आणलेल्या 'त्या' हँडबुकची सरन्यायाधीशांकडून चिरफाड नेमका प्रकार काय?6 मार्च 2026 रोजी युपीएससीचा निकाल जाहीर झाला. यानंतर काही बातम्या समोर आल्या त्यानुसार, आकांक्षा सिंह नावाच्या दोन महिला उमेदवारांनी दावा केला की, दोघी युपीएससी पास झाल्या असून दोघींनाही ३०१ वी रँक मिळाली आहे. पण यामुळं एकच गोंधळ निर्माण झाला. यासंदर्भात दोन्ही उमेदवारांची डिटेल माहिती देखील ऑनलाईन व्हायरल झाली. त्यानुसार, एक आकांक्षा सिंह ही बिहारची मुलगी असून तिनं शेअर केलेल्या अॅडमिट कार्डवर तिचा रोल नंबर 0856794 असा देण्यात आला पण याच डॉक्युमेंटवरील बारकोडमध्ये वेगळाच म्हणजे 0856569 हा क्रमांक दिसून येत आहे. त्यामुळं अनेक शंका उपस्थित झाल्या होत्या.
Ashok Chavan : मराठवाड्यासाठी मोठी बातमी : नांदेड-लातूर प्रवास होणार अवघ्या सव्वा तासात; अशोक चव्हाणांनी लावला जोरकारण दुसरी आकांक्षा सिंह नावाची मुलगी गाझीपूर, उत्तरप्रदेशची रहिवासी आहे. या दोघींनी यापूर्वी दावा केला होता की, दोघींचाही एकच रोल नंबर असून त्यांना रँकही सारखीच म्हणजे ३०१वी रँक मिळाली आहे. म्हणजेच दोघींची नावं सारखीच, रोल नंबर सारखाच आणि मिळालेली रँकही सारखीच. पण नंतर युपीएससीनं या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर आता खरं सत्य समोर आलं आहे. त्यानुसार बिहारच्या आकांक्षा सिंह हिचे कागदपत्रे बनावट असल्याचं समोर आलं आहे. माध्यमांनीच खोलात जाऊन माहिती काढल्यानंतर हे स्पष्ट झालं की, रणवीर सेनेच्या माजी प्रमुखाच्या नातीनं ही परीक्षाच दिलेली नाही.
Jalgaon APMC : गिरीश महाजनांनी फिरवली जादूची कांडी, सहा महिन्यांपूर्वी विरोधात दंड थोपाटणारे चारही संचालक भाजपमध्येयामुळं उत्तर प्रदेशच्या गाझिपूरच्या आकांक्षा सिंह हीन युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली असून तिलाच ३०१ वी रँक मिळाली आहे, असं आता युपीएससीनं स्पष्ट केलं आहे. हे सांगताना आयोगानं देखील आपल्याकडून पडताळणी करण्यात आलेली कागदपत्रे समोर आणली आहेत. त्यामुळं जाहीर करण्यात आलं की, ३०१ रँक मिळवणऱ्या आकांक्षा सिंहचा रोल नंबर हा 0856794 हा आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशच्या या आकांक्षा सिंहच्या वडिलांचं नाव रणजीत सिंह आणि आईचं नाव नीलम सिंह असं आहे. ही माहिती युपीएससीच्या डेटाशी जुळली आहे, असंही आयोगानं स्पष्ट केलं आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.