संजू सॅमसन T20 विश्वचषक 2026: आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या (T20 World Cup 2026) अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड (Ind vs NZ Final) यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने तब्बल 96 धावांनी विजय मिळवला. भारताने सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. भारताच्या संजू सॅमसनला (Sanju Samson) मालिकावीर म्हणून पुरस्कार देण्यात आला. दरम्यान, संजू सॅमसनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
टीम इंडियाला फायनलपर्यंत पोहोचवण्यात आणि विश्वचषक जिंकून देण्यात संजू सॅमसनची मोठी भूमिका राहिली. संजू सॅमसनने या स्पर्धेत 5 सामन्यांच्या 5 डावांत तब्बल 321 धावा केल्या. त्यामुळे तो या स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. संजू सॅमसन नम्र आणि शांत स्वभावासाठी ओळखला जातो. याचचं उदाहरण टीम इंडियाने विश्वचषक जिंकल्यानंतर एका व्हिडीओने समोर आले. (Sanju Samson T20 World Cup 2026)
टीम इंडियाचे विश्वचषक जिंकल्यानंतर सर्व खेळाडू जोरदार सेलिब्रेशन करत होते. यामध्ये हार्दिक पांड्या आणि इशान किशन यांनी डान्सही केला. तर काही खेळाडू त्यांच्या कुटुंबीयांसोबत व्यस्त होते. मात्र याचवेळी सामनावीरची ट्रॉफी घेऊन संजू सॅमसन एका कोपऱ्यात बसून सर्व पाहात होता. यानंतर समालोचक हर्षा भोगले संजू सॅमसनकडे गेले आणि त्याच्याशी गप्पा मारत बसले. चाहत्यांना संजू सॅमसनचा हा साधेपणा प्रचंड आवडला. आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी सतत कॅमेऱ्यांसमोर, लाइमलाइटमध्ये येण्याची आवश्यकता नसते, असं नेटकरी कमेंट करत आहेत. (Sanju Samson T20 World Cup 2026)
टी-20 विश्वचषक 2026 च्या स्पर्धेत संजू सॅमसनने कहर केला. संजू सॅमसनने या स्पर्धेत 5 सामन्यांच्या 5 डावांत तब्बल 321 धावा केल्या. यावेळी संजू सॅमसनची सरासरी 80.25 आणि स्ट्राईक रेट 199.37 इतका होता. संजूने केवळ तीन अर्धशतकेच केली नाहीत तर 24 षटकारही ठोकले. यासह एका विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही संजू सॅमसनने आपल्या नावावर केला. विशेष म्हणजे नॉकआउट सामन्यात संजू सॅमसनने वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 97 धावा, सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध 89 आणि न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलच्या सामन्यात 89 धावा ठोकल्या. यामुळे संजू सॅमसनला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून घोषित करण्यात आले.
आणखी वाचा
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.