छत्रपती संभाजीनगर: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही भाजप महायुतीने मोठं यश मिळवलं असून भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. तर, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादीही अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावर आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेतही भाजपने बहुमत मिळवले आहे. मात्र, संभाजीनगर (Sambhajinagar) पंचायत समितीवर भाजपला एकहाती सत्ता स्थापन करता येणार नाही. याच पंचायत समितीच्या सभापती-उपसभापति निवडीवरुन भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळालं. यावेळी, उबाठाचे नेते तथा माजी आमदार अंबादास दानवे यांनी भाजपच्या कल्याणराव गायकवाडांची कॉलर पकडल्याचं दिसून आलं.


छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड आज होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज निवडीपूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले, दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली अन् ते एकमेकांच्या अंगावरही धावून गेले. यावेळी, माजी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपच्या कल्याण गायकवाड यांची कॉलर पकडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीत सभापतीपदासाठी भाजपकडून कल्याण गायकवाड यांनी अर्ज दाखल केला आहे.



ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा कोणाला?


दरम्यान, छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणूक होत असून सभापतीपदासाठी 20 पैकी 11 जागांची गरज आहे. भाजपकडे 7 तर शिंदेंच्या शिवसेनेकडे 6 जागा आहेत. त्यामुळे, येथील सभापतीपदसाठी भाजपला 4 जागांची गरज आहे. तर, जो पक्ष उपसभापतीपद आपल्याला देईल, त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतली आहे. त्यामुळे, येथे दोन शिवसेना एकत्र येतील, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसून आलं.


संभाजीनगर पंचायत समिती एकूण सदस्य संख्या 20


भाजप 6 + 1 पुरस्कृत = 7
एकनाथ शिंदे सैन्य 6
ठाकरे गट 4
काँग्रेस 1
राष्ट्रवादी अजित पवार गट 1
स्ट्राइक १


पंचायत समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष आज ठरणार


मागील महिन्यात पार पडलेल्या निवडणुकीत उद्धवसेनेचे जिल्हा परिषदेत 9 तर पंचायत समिती निवडणुकीत 11 सदस्य निवडून आले आहेत. आज 10 मार्च रोजी पंचायत समिती अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत उद्धवसेनेच्या उमेदवारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे उद्धवसेनेने आपल्या उमेदवाराला उपाध्यक्षपद देणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला अध्यक्षपदासाठी पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. संभाजीनगर जिल्ह्यातील 9 पंचायत समितींचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी आज रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत जो पक्ष उपाध्यक्षपद देईल, त्या पक्षासोबत जाण्याची तयारी उद्धवसेनेने केली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. यासाठी अध्यक्षपदासाठी इच्छुक पक्षाच्या उमेदवारांसोबत गोपनीय चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.


छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीमध्ये उद्धवसेनेचे 4, गंगापूरमध्ये 2, खुलताबाद, वैजापूर, कन्नड, सोयगाव आणि फुलंब्री पंचायत समितीमध्ये प्रत्येकी एक सदस्य आहे.


पैठण पंचायत समिती निर्विवाद शिंदेसेनेकडे


पैठण पंचायत समिती निवडणुकीत शिंदेसेनेचे सर्वाधिक सदस्य आहेत. या पंचायत समितीचे सभापती व उपसभापतिपदी शिंदेसेनेचा उमेदवार बिनविरोध विजयी होऊ शकतो.


पंचायत समितीवर कोणाचा झेंडा ?


पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जाहीर केला. पीठासन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. ग्रामविकास विभागाने पत्र पाठवून 20 मार्चपूर्वी जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष, पं. स.चे सभापती आणि उपसभापती निवडण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, सभापती, उपसभापती निवडीसाठी दुपारी 2 वाजता सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.


हेही वाचा


लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO




आणखी वाचा



Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.