कऱ्हाड - धोंडेवाडी (ता. कऱ्हाड) येथे विहीरीत गवा पडल्याची घटना आज सायंकाळी घडली. तर अन्य काही गवे गावातुन फिरत आहेत. त्यामुले तेथे भितीचे वातावरण तयार झाले आहे. गव्याला काढण्यासाठी प्रयत्न सुरु होते.
रात्री उशीरा त्याला विहीरीबाहेर काढण्यात वन विभागाला यश आले. दरम्यान गव्याने दिलेल्या धडकेत दोघेजण जखमी झाले आहेत. सदाशिव काकडे (वय ७०), वेदांत संतोष पाटील (वय १६) यांना गव्याने जखमी झालेल्यांची नावे असल्याचे ग्रामस्थांनी सांगीतले.
याबाबत मिळालेली माहिती अशी, धोंडेवाडी परिसरात काही दिवसांपासून गव्यांचा वावर वाढला आहे. आज दरा नावाच्या शिवारातील सर्जेराव खरात यांच्या विहिरीत एक गवा पडल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.
विहिरीत पडलेल्या गव्याला बाहेर काढण्यासाठी वन विभागासह स्थानिक ग्रामस्थांकडून प्रयत्न सुरू करण्यात आले. दरम्यान, गाव परिसरात आणखी काही गवे फिरत असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः शेतकरी आणि शेतमजूर यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली असून वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होवुन त्यांनी त्याला बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. रात्री त्याला विहीरीबाहेर काढण्यात यश आले. त्याला वन विभागाने ताब्यात घेतले आहे. दरम्यान गव्याने दिलेल्या धडकेत दोघे जखमी झाले आहेत. त्यामुळे गव्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांतुन होत आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.