PNG Holder Not get LPG: पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने घरगुती गॅस पुरवठ्या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने नियमात सुधारणा करत म्हटले आहे की ज्या ग्राहकांकडे पाईप नॅचरल गॅस (PNG) कनेक्शन आहे ते आता एलपीजी सिलिंडर मागवू शकणार नाहीत आणि ना नविन कनेक्शन घेऊ शकणार ना रिफिल करु शकणार आहेत. मंत्रालयाने शनिवारी १४ मार्च रोजी एक निवदेन देत सांगितले की सप्लाय ऑर्डरमध्ये केलेल्या सुधारणेअंतर्गत नवा नियम लागू करण्यात आला आहे. यानुसार ज्या घरात आधीपासूनच पीएनजी कनेक्शन आहे, त्यांना एलपीजी सिलिंडरचा लाभ घेता येणार नाही.
तेल कंपन्यांना देखील निर्देशयाशिवाय सुधारित नियमांनुसार सरकारी तेल कंपन्यांना देखील निर्देश देण्यात आला आहे की ते पीएनजी कनेक्शनवाल्या ग्राहकांना नविन एलपीजी कनेक्शन वा रिफिल उपलब्ध करु नये. सरकारने म्हटले आहे की या पावलामुळे घरगुती गॅस वितरण प्रणालीला अधिक सुरळीत करण्यास मदत मिळेल आणि गॅसचा वापर योग्य प्रकारे होण्यास मदत मिळणार आहे.
LPG पुरवठ्यावर वाढला दबावजगातला दुसरा सर्वात मोठा एलपीजी ग्राहक भारत त्याच्या गरजेच्या जवळपास ९० टक्के गॅस आयातीद्वारे पूर्ण करतो. परंतू मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि होर्मुज स्ट्रेट बंद झाल्याने गॅस पुरवठ्यावर दबाव वाढला आहे. आकड्यानुसार ९ मार्च पासून सुरु झालेल्या आठवड्यात भारतात एलपीजीची शिपमेंट सुमारे २,७०,००० टन राहण्याचा अंदाज आहे, जी एप्रिल २०२३ नंतर सर्वात निच्चाकांची स्थिती मानली जात आहे.
Kpler च्या डेटानुसार मध्य पूर्वेतून येणारा पुरवठा जवळपास थांबला आहे.याचे मोठे कारण हे आहे की अमेरिका आणि इस्राईलच्या हल्ल्यानंतर इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुजला बंद केला आहे, आणि हा जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी एक महत्वाचा समुद्री मार्ग आहे. या मार्गाने आखाती देशातून मोठ्या प्रमाणात तेल आणि गॅस जगाच्या विविध भागात पाठवला जातो.
सरकारने या स्थितीला पाहून इतर अनेक देशांकडून एलपीजी कार्गाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे तेल मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी संसदेत सांगितले. ते म्हणाले की अमेरिका, नॉर्वे, कॅनडा, अल्जेरिया आणि रशियाकडून अतिरिक्त पुरवठा करण्याचे प्रयत्न सुरु आहे.
यासोबतच भारत सरकारने इराणशी बोलणी सुरु केली आहेत. त्यामुळे भारताकडे येणाऱ्या जहाजांना सुरक्षित मार्ग मिळणे आणि संरक्षण मिळणे शक्य होणार आहे. या संदर्भात काही बाबतीत यश मिळाले आहे.
सरकारने शनिवारी आपल्या अधिकृत वक्तव्यात म्हटले की होर्मुज स्ट्रेटपासून दोन एलपीजी जहाजांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. या जहाजांवर जवळपास ९२,७०० मेट्रीक टन एलपीजी लादलेला आहे. शिवालिक आणि नंदा देवी नावाची एलपीजीची दोन जहाजे मार्गस्थ झाली आहेत असे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी सांगितले.
घरगुती उत्पादन वाढवण्याचे आदेशसरकारने घरगुती पुरवठा वाढवण्यासाठी पावले उचलली आहेत. रिफायनरींनी एलपीजीचे उत्पादन अधिक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे घरगुती उत्पादन सुमारे २८ टक्के वाढले आहे.आयातीत कमतरता होणार असल्याने सरकारने घरगुती उत्पन्न वाढवण्याचे आदेश दिले आहेत.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.