नितीश राणे : राणे कुटुंबीयामध्ये सतत भाडंण लावणं, काड्या लावणं हे काही लोकांचे काम सुरु असल्याचे वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी केलं. नगर पालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काड्या लावणारी लोक कॉमन आहेत. सातत्याने वाद निर्माण करुन आपली पोळी भाजण्याचा कार्यक्रम जिल्ह्यात सुरु असल्याचे नितेश राणे म्हणाले. ते कुठेतरी थांबला पाहिजे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमच्या राणे कुटुंबीयामध्ये वाद लावण्याचे काम सुरु आहेत. रवींद्र चव्हाण हे अतिशय मनाने स्वच्छ माणूस आहेत. रवींद्र चव्हाण आणि राणे कुटुंबीयांमध्ये दरी निर्माण करण्याचे काम काही जण करत आहेत, ते वेळीच थांबवावं असे राणे म्हणाले.


कणकवली नगरपरिषदेचा निकाल लागल्यानंतर दुःख झालं


दरम्यान, कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त कुडाळमध्ये मंत्री नितेश राणे बोलत हते. यावेळी नितेश राणेंनी विरोधकांना चांगलाच सुनावल आहे. सिंधुदुर्गची जनता आणि नारायण राणे हे एक अतूट नातं आहे. ते नात जोपासणे आणि घट्ट करण्याचे काम करत आहोत. निवडणुकींच्या काळात सातत्याने गैरसमज निर्माण करण्याचे काम सुरू असते. एका बाजूला चार वर्षात खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास आणि दुसऱ्या बाजूला चार वर्षात हिशोब चुकते होणार. मला निवडणूक हरायला आवडत नाही, कणकवली नगरपरिषदेचा निकाल लागल्यानंतर दुःख झालं. पण माझा पराभव झाला असला तरी निलेश राणेंच्या समोर झाला. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. शेवटी राणेंच्या समोर राणे जिंकल्याचे नितेश राणे म्हणाले. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमच्या राणे कुटुंबीयामध्ये वाद लावण्याचे काम सुरु आहेत. रवींद्र चव्हाण हे अतिशय मनाने स्वच्छ माणूस आहेत असे नितेश राणे म्हणाले.


कुडाळ एसटी डेपो मैदानावर निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त जंगी कार्यक्रम


आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस आहे. त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आज (17 मार्च रोजी) सायंकाळी 5 वाजता कुडाळ एसटी डेपो मैदान येथे मोठ्या उत्साहात व हजारोंच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे स्थानिकचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते.


महत्वाच्या बातम्या:


Nitesh Rane: कुंभमेळ्यात हिंदू सोडून कुणी स्टॉल लावला तर स्टॉलसकट उखडून टाका, आम्ही मंत्रालयात बसलोय; नितेश राणेंचं वक्तव्य




आणखी वाचा



Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.