Jo Kent: इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल यांच्यामध्ये सध्या सुरु असलेलं युद्ध आणि त्यामुळं निम्म्या जगाला वेठीला धरल्याचा परिणाम म्हणून अमेरिकेच्या सैन्य दलांमध्येच फूट पडल्याचं चित्र आहे. अमेरिकेच्या दहशतवादविरोधी केंद्राचे प्रमुख जो केंट यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी थेट प्रेसिडंट ट्रम्प यांना पत्र लिहिलं असून युद्धाला आपला कुठल्याही प्रकारे पाठींबा नसल्याचं ठामपणे आणि निर्भिडपणे सांगितलं आहे.
ट्विटरवरुन आपल्या राजीनाम्याची घोषणा करता जो केंट यांनी म्हटलं की, दीर्घ विचारविनिमयानंतर, 'नॅशनल काऊंटरटेररिझम सेंटर'च्या (NCTC) संचालकपदावरून आजपासून राजीनामा देण्याचा निर्णय मी घेतला आहे. इराणमध्ये सध्या सुरू असलेल्या युद्धाचे समर्थन करणे, माझ्या सदसद्विवेकबुद्धीला मान्य नाही. इराणकडून आपल्या राष्ट्राला कोणताही तात्काळ धोका नव्हता आणि हे युद्ध आपण इस्रायल व त्यांच्या अमेरिकेतील बलाढ्य लॉबीच्या दबावामुळेच सुरू केले आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या संचालक यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकन जनतेची सेवा करणं हा माझा मोठा सन्मान होता, असंही केंट यांनी म्हटलं आहे. शेवटी ईश्वर अमेरिकेचं कल्याण करो..असंही त्यांनी म्हटलं आहे.
Sangli ZP : सांगलीचा फैसला 14 तासांत! महाविकास आघाडीच्या इराद्याला सुरुंग लागणार की भाजपला सत्तेपासून लांब ठेवणारदरम्यान, आपल्या एक पानी सविस्तर पत्रामध्ये जो केंट यांनी अमेरिकन सरकारशी आपल्या असहमतीचे अनेक मुद्दे मांडले आहेत. एक प्रकारे सरकारवर त्यांनी आरोपच केले आहेत. पण हे सर्वकाही इस्रायल आणि अमेरिकेच्या हट्टापोटी सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पण केंट यांच्या आक्षेपांना व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सहाय्यक कॅरोलिन लिव्हीट यांनी ट्विटरवर म्हटलं की, केंट यांनी आपल्या पत्रात केलेले अनेक दावे खोटे आहेत, पण त्यापैकी एकावर मी विशेषतः भाष्य करू इच्छिते, तो म्हणजे, "इराणकडून आपल्या राष्ट्राला कोणताही तात्काळ धोका नव्हता" हा तोच खोटा दावा आहे जो डेमोक्रॅट्स आणि उदारमतवादी माध्यमांमधील काही जण वारंवार करत आले आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्टपणे आणि उघडपणे सांगितल्याप्रमाणे, त्यांच्याकडे इराण अमेरिकेवर प्रथम हल्ला करणार असल्याचे सबळ आणि खात्रीशीर पुरावे होते. हे पुरावे अनेक स्रोत आणि घटकांमधून संकलित केले गेले होते. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प कोणत्याही परिस्थितीत परकीय शत्रूविरुद्ध लष्करी मालमत्ता तैनात करण्याचा निर्णय घेणार नाहीत. इराण हा जगातील दहशतवादाला सर्वाधिक पाठिंबा देणारा देश आहे.
Vyanktesh Munde: परळीच्या चालखोर तहसीलदाराचं अखेर निलंबन! आधी रंगेहात पकडला मग तुरुंगात धाडला; सविस्तर वाचा प्रकरणइराणची राजवट दुष्ट आहे. त्यांनी अभिमानाने अमेरिकन नागरिकांची हत्या केली, आपल्या देशाविरुद्ध युद्ध पुकारले आणि 'ऑपरेशन एपिक फ्युरी' सुरू होईपर्यंत आम्हाला उघडपणे धमक्या दिल्या. इराण आपल्या नौदल क्षमतेसोबत आपल्या कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा आक्रमकपणे विस्तार करत होता, जेणेकरून त्यांना संरक्षण मिळेल. म्हणजेच, त्यांच्याकडे अशा प्रकारची क्षमता असेल जी त्यांना अमेरिकेला आणि उर्वरित जगाला ओलीस ठेवण्यास संरक्षण देईल. त्या राजवटीचा उद्देश त्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा ढाल म्हणून वापर करून आपले अंतिम ध्येय होतं ते म्हणजे अणुशस्त्रे तयार करण्याचा कार्यक्रम सुरु ठेवणे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अखेरीस असा निर्णय घेतला की, इस्रायलसोबत संयुक्त हल्ला केल्यास दहशतवादी इराणी राजवटीच्या पहिल्या हल्ल्यामुळे अमेरिकन नागरिकांच्या जीवाला असलेला धोका मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या हिताला असलेल्या या तात्काळ धोक्याचा सामना करता येईल. या सर्वांमुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प या निष्कर्षावर पोहोचले की, अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी ही लष्करी कारवाई आवश्यक होती आणि म्हणूनच त्यांनी 'ऑपरेशन एपिक फ्युरी' ही यशस्वी मोहीम रोबवली आणि अखेरीस, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हा निर्णय इतरांच्या, अगदी परदेशी देशांच्या प्रभावाखाली घेतला, हा हास्यास्पद आरोप अपमानकारक आणि हास्यास्पद दोन्ही आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.