कल्याणच्या आधारवाडी जेलच्या गेटवर गुंडांनी वाढदिवस साजरा केला
गुंडांनी फटाक्यांची आतिषबाजी केली
वाढदिवसाची कायपण करणाऱ्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
कल्याणमधील आधारवाडी कारागृहाच्या बाहेर गुंडांनी वाढदिवस साजरा करत फटाक्यांची आतिषबाजी करणाऱ्या गुंडांवर खडकपाडा पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. या प्रकरणात रोहित जगदाळे, क्षितिज भगत आणि आकाश खडसे या तिघांना अटक करण्यात आली आहे.
Kalyan Crime News: ढाब्यावर गाणी लावण्यावरून डोंबिवलीत तरुणींना मारहाण, तरुण फरारमिळालेल्या माहितीनुसार, कारागृहात बंद असलेल्या एका गुंडाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या साथीदारांनी जेलच्या गेटवर मोठ्या प्रमाणात फटाके फोडून जल्लोष केला. कारागृहासारख्या संवेदनशील परिसरात अशा प्रकारची आतिषबाजी केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच उपयुक्त अतुल झेंडे व सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधितांना ताब्यात घेतले.
Kalyan Crime News: कोयत्याचा धाक दाखवत पानटपरी चालकाला मारहाण करून लुटले, घटना CCTV त कैदपोलिसांनी अटक केलेल्या तिघांविरुद्ध सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, कायद्याचा धाक दाखवण्यासाठी पोलिसांनी आरोपींची जेल परिसरात धिंड काढली आहे. या कारवाईमुळे अशा प्रकारे गुंडगिरीचा आव आणणाऱ्यांना चांगलाच इशारा मिळाला आहे. खडकपाडा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या प्रकारच्या कृत्यांना अजिबात पाठीशी घातले जाणार नाही, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
कल्याणमध्ये नेमकी घटना कुठे घडली?
कल्याणच्या आधारवाडी जेलबाहेर ही घटना घडली.
जेलबाहेर काय प्रकार घडला होता?
गुंडाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या साथीदारांनी जेल गेटबाहेर फटाके फोडले.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.