Sangli ZP : सांगली जिल्हा परिषदची अध्यक्ष- उपाध्यक्ष पदाची निवडणूक बुधवारी होतं आहे. अशातच भाजपला सत्तेबाहेर ठेवत महायुतीतील घटक पक्ष महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट हे एकत्र येत महायुतीतील राष्ट्रावादी व शिवसेनामधील काही सदस्य फोडल्याचा दावा करत आहेत. त्यामुळे उद्या होणाऱ्या निवडीत जवळपास महाविकास जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करेल हे जवळपास निश्चित समजले जाते . मात्र दुसरीकडे भाजपने जिल्हा परिषदेवर अध्यक्ष महायुतीचाच होणार असा दावा केला आहे. शिवसेना आपल्या सोबत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Vyanktesh Munde: परळीच्या चालखोर तहसीलदाराचं अखेर निलंबन! आधी रंगेहात पकडला मग तुरुंगात धाडला; सविस्तर वाचा प्रकरणसांगली महायुतीमधील खदखद जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर बाहेर पडल्याचे चित्र आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आमदार गोपीचंद पडळकर यांना शह देण्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यासह महायुतीमधील राष्ट्रवादीचे नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यात निकालानंतर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला गृहीत धरण्याचे काम भाजपकडून होत असल्याचा आरोप घटक पक्षातील नेत्यांनी केला होता. भाजपनेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून काँग्रेस नेत्यांना थेट आव्हान देण्याची भूमिका घेतल्यानंतर महाविकास आघाडीतील नेते इर्षेला पेटले आहेत. त्यामुळे सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील त्यांच्यासोबत नऊ बैठका घेत जिल्हा परिषदेमधील सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र शिवसेनेने तटस्थ भूमिका घेतली होती.
Parbhani ZP: परभणी झेडपीत महायुतीच जमलं! अध्यक्ष भाजपचा, उपाध्यक्ष राष्ट्रवादीचा तर शिंदेसेनेला...अखेर जिल्हा परिषद निवडणुकीच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्ष एकत्र येत महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील काही सदस्य फोडण्याचा दावा करत आहेत. जवळपास 40 सदस्य हे थंड हवेच्या ठिकाणी अज्ञातस्थळी आहेत. तर भाजप जनसुराज्य आणि रयत क्रांती संघटनेचे सदस्य कोल्हापुरात आहेत. बुधवारी अध्यक्ष निवड होणार असल्याने सकाळी 11 वाजता दोन्ही गटाचे सदस्य हे जिल्हा परिषदेत दाखल होणार आहेत. तत्पूर्वी दोन्ही गटाकडून अध्यक्ष आमचाच होईल असा दावा करण्यात येत आहे. भाजपने शिवसेनेला सोबत घेतल्यानंतर 26 सदस्य आमच्याकडे असल्याचा दावा केला आहे. महाविकास आघाडीने काँग्रेस 11, राष्ट्रवादी 18 ठाकरे गट एक असे 30 आणि महायुतीतील राष्ट्रवादीचे सहा शिवसेनेचे चौघेजण आपल्या सोबत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या अध्यक्ष निवडीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष आहे.
West Bengal Election 2026: TMCनं एकाच वेळी जाहीर केले सर्व उमेदवार! CM ममता बॅनर्जी 'या' जागेवरुन लढणार; भाजपला चेकमेट करणार?सांगली जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या 18, भाजपचे 16, काँग्रेस 11, राष्ट्रवादी (अजित पवार) 6, शिंदेसेना 7, रयत क्रांती व जनसुराज्य प्रत्येकी 1, असे संख्याबळ आहे. महायुतीकडे एकूण 31 तर, राष्ट्रवादी (शरद पवार), काँग्रेस व उद्धवसेनेचे मिळून ३० सदस्य आहेत.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.