Sangli News: सांगली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली महापालिका व जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता कायम ठेवण्याचा दावा केला होता. सांगली महापालिकेमध्ये बहुतांश जागा मिळाल्यानंतर सत्ता स्थापन झाली. महापालिकेला मिळालेल्या यशानंतर जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजपने प्रयत्नांची पारकाष्ठा केली.


मात्र मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मनसुबे राष्ट्रवादीचे नेते आमदार आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी उधळून लावले. कोणावरही टीकाटिप्पणी न करता आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर भाषण न करता जयंत पाटील यांनी झेडपी वर मिळवलेली सत्ता ही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप नेत्यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसते.

Top 10 News: एका फिर्यादीनं रातोरात सूत्र फिरलं, राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना...ते रुपाली चाकणकर यांची अखेर गच्छंती? तात्काळ राजीनाम्याचे फडणवीसांचे आदेश

सांगली जिल्हा परिषदेवर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीनंतर महाविकास आघाडी व राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपला अध्यक्ष- उपाध्यक्ष विराजमान केला. महायुतीला बहुमत असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आपल्या सोबत घेण्यात जयंत पाटील यशस्वी झाले. मात्र भाजपची असलेली एकाधिकारशाहीला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेनेच्या दोघा सदस्यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. शिवाय विजयानंतर जयंत पाटील यांनी थेट चंद्रकांत पाटील यांच्यावर बोलणे टाळले.

Rupali Chakankar: रुपाली चाकणकर अन् पोलीस महासंचालकांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? जाणून घ्या इनसाईड स्टोरी

मात्र, पराभवानंतर जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत चंद्रकांत पाटील यांनी भूमिका मांडत एक प्रकारे पराभव न पचल्याची पोहोचपावती दिली आहे. महायुतीमधील मित्र पक्षांच्या सदस्यांना फोडून सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केला, मात्र ट्रम्पला हरवल्यासारखा महाआघाडीच्या नेत्यांचा अविर्भाव आहे, राजकारणात जे पराजय होत असतात, मात्र एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही, अशा अस्सल गावरान भाषेत सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांना टोला लगावला आहे.


तर भाजपच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांचा महायुतीतील घटक पक्षांसोबत नेत्यांसोबत असलेल्या कमी संपर्कामुळे हा पराभव झाल्याचे मान्य चंद्रकांत पाटील यांनी केलं. शिवाय महायुतीतील घटक पक्षातील नेत्यांमधील असलेले मतभेद होते. हे देखील त्यांनी अप्रत्यक्षपणे दाखवून दिले.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.