राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्या आणि महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नाशिकस्थित ढोंगी बाबा अशोक खरात याचा पर्दाफाश झाल्यानंतर आणि त्याच्याशी असलेल्या रूपालींच्या जवळच्या संबंधांचा खुलासा झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी होत होती. अशोक खरातचे अनेक राजकारण्यांसोबतचे फोटो समोर आले. त्याचे अनेक आक्षेपार्ह व्हिडिओदेखील सापडले आहेत. अशोक खरात याच्याशी संबंधित बलात्कार प्रकरणात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे.
आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना पत्र लिहून विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) निष्पक्ष आणि सखोल चौकशीची मागणी केली आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७४/२०२६ अन्वये, आरोपी बनावट बाबा अशोक खरात याच्यावर गेल्या तीन वर्षांपासून एका ३५ वर्षीय महिलेवर वारंवार बलात्कार करून तिला धमकावल्याचा गंभीर आरोप आहे.
Rupali Chakankar Resigns: रुपाली चाकणकर यांचा अखेर राजीनामा! राजीनाम्याचं कारणही सांगितलंमहिला आयोगाने चिंता व्यक्त केली आहे की, हे प्रकरण केवळ एका महिलेपुरते मर्यादित नसून, आरोपीने अंधश्रद्धांचा गैरफायदा घेऊन अनेक महिलांचे शोषण केले असावे. एसआयटी मार्फत कोणत्याही दबावाशिवाय निष्पक्ष चौकशी व्हावी. पीडित महिलांची ओळखगोपनीय ठेवून त्यांच्या सुरक्षेची खात्री करणे. डिजिटल पुराव्याच्या आधारे माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत कठोर कारवाई व्हावी. विहित मुदतीत तपास पूर्ण करून लवकरच आरोपपत्र दाखल करणे.
महिला आयोगाने असेही म्हटले आहे की, ते संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून असून, पीडितांना जलद न्याय मिळावा यासाठी नाशिक पोलिसांना नियमित प्रगती अहवाल देण्यास सांगितले आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने नाशिक येथे उघडकीस आलेल्या अशोक खरात याच्याविरुद्धच्या अत्यंत गंभीर प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आहे. या प्रकरणात महिलांची फसवणूक करून, अंधश्रद्धेच्या आडून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप अत्यंत चिंताजनक आहे. हे प्रकरण राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण करणारे आहे. या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची आरोपीसोबतची जवळीक उघड झाली आहे.
Ashok Kharat: कोट्यवधींची जमीन, आलिशान बंगला, फार्महाऊस… अशोक खरात १५ वर्षांत कसा बनला २०० कोटींचा मालक? कुंडली आली समोरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या आपल्या राजीनामा पत्रात रूपाली चाकणकर यांनी आपण वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, माझी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली होती. माझ्या वैयक्तिक कारणाने मी स्वेच्छेने सदर पदाचा राजीनामा ह्या पत्राद्वारे आपणांस सादर करत आहे. आजवर माझ्यावर विश्वास दाखवून आपण मला सर्वतोपरी सहकार्य केले त्याबद्दल मी आपली व सर्व सहकाऱ्यांची शतशः ऋणी आहे. भविष्यातही आपले असेच सहकार्य राहील असा मला विश्वास आहे. तरी आपण माझा अध्यक्षा, राज्य महिला आयोग ह्या पदाचा राजीनामा स्वीकारावा अशी आपणांस नम्र विनंती आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.