देशाला ऊर्जा क्षेत्रात भक्कमपणे पाय रोवण्याची गरज आहे. यासाठी देश पातळीवर बरेच प्रयत्न केले जात आहेत. असं असताना जॅक्सन ग्रुपने भारताचे माजी क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली यांच्यासोबत भागीदारीची घोषणा केली आहे. जॅक्सन ग्रुप ऊर्जा आणि पायभूत सुविधांच्या क्षेत्रात गेल्या 8 दशकांपासून कार्यरत आहे. कंपनीच्या मते, विश्वास आणि भविष्याच्या दृष्टीने नवनिर्मितीला सर्वोच्च महत्त्व देते. त्यामुळे सौरव गांगुलीसोबतची भागीदारी एक आदर्श नेतृत्व देईल, असं जॅक्सन ग्रुपच्या अध्यक्षांचं म्हणणं आहे. या भागीदारीबाबत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि जॅक्सन ग्रुपचे अध्यक्ष समीर गुप्ता यांनी टीव्ही 9 सत्ता संमेलनात नेमकं काय सांगितलं ते जाणून घेऊयात.

काय म्हणाले जॅक्सन ग्रुपचे अध्यक्ष?

सौरव गांगुली यांच्या भागीदारीमुळे स्वच्छ उर्जेच्या दूरदृष्टीला अधिक चालना मिळणार आहे. जॅक्शन ग्रुपचे अध्यक्ष समीर गुप्ता म्हणाले की, दादाचं जॅक्सन परिवारात स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. सौरव गांगुली हे नेतृत्व, सामर्थ्य आणि उत्कृष्ट कामगिरीचे जिवंत उदाहरण आहेत. सौरव गांगुली यांची दूरदृष्टी आमच्या ग्रुपच्या दूरदृष्टीशी पूर्णपणे जुळणारी आहे. ही भागीदारी सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करण्याच्या आमच्या सामायिक विश्वासाचे प्रतीक असेल. जॅक्शन ग्रुपचे अध्यक्ष समीर गुप्ता पुढे म्हणाले की, दादाच्या विश्वासार्हतेमुळे आमच्या ब्रँड आणखी मजबूत होईल हा विश्वास आहे.जगभरात आमच्या शाश्वत उपायांचा स्वीकार अधिक वेगाने वाढण्यास मदत होईल. कारण आता आमची वाढ ही मजबूत नेतृत्वावर आधारलेली असणार आहे.


जॅक्सन ग्रुपचे अध्यक्ष कंपनीबाबत म्हणाले की, हा ग्रुप उत्पादन, प्रकल्प विकास, ईपीसी आणि ओ अँड एम सेवा या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. शाश्वत विकासाला पाठिंबा देण्यासाठी हा ग्रुप मनुष्यबळ आणि तंत्रज्ञानावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. 80 वर्षांहून अधिकचा इतिहास असलेला जॅक्सन ग्रुप भारताच्या ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांना सातत्याने आकार देत आहे. त्याचे कार्य नवोन्मेष आणि ग्राहक-प्रथम या दृष्टिकोनातून प्रेरित आहे.

सौरव गांगुलीने सांगितलं की…

सौरव गांगुली म्हणाला की, जॅक्सनचा दृष्टिकोन मग तो वितरित ऊर्जा, सौर ऊर्जा, ग्रीन मॉलिक्युल्स असो किंवा पायाभूत सुविधा (जसे की वीज, मेट्रो, नागरी बांधकाम आणि जल व्यवस्थापन) असो – प्रत्येक क्षेत्रात अत्यंत प्रभावी आहे. भारताच्या ऊर्जा क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि हरित भविष्य घडवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ब्रँडशी जोडले गेल्याचा मला आनंद आहे.

जॅक्सन ग्रुप कंपनी कसं काम करते?

जॅक्सन ग्रुपचे अध्यक्ष म्हणाले की, 1947 मध्ये स्थापित झालेल्या जॅक्सन ग्रुपने डिझेल जनरेटरच्या निर्मितीने सुरुवात केली. आता ही कंपनी ऊर्जा आणि पायाभूत सुविधांसाठी बहु-क्षेत्रीय उपाययोजना पुरवणारी कंपनी बनली आहे. आता तिचे कार्यक्षेत्र वितरित ऊर्जा, सौर ऊर्जा, नवीकरणीय ऊर्जा, ग्रीन मॉलिक्युल्स, पर्यायी इंधन आणि ऊर्जा साठवण प्रणाली या क्षेत्रांपर्यंत विस्तारलेले आहे. ही कंपनी नवीकरणीय ऊर्जा, मेट्रो, विद्युत, पाणी आणि नागरी EPC सेवांमध्येही काम करते. कंपनीचे सहा उत्पादन युनिट्स आणि 30 हून अधिक विक्री कार्यालये आहेत. जॅक्सनची 12 आंतरराष्ट्रीय कार्यालये देखील आहेत. जॅक्सन ग्रुपचे अध्यक्ष समीर गुप्ता पुढे म्हणाले की, कंपनी इलेक्ट्रिक वाहनांवर देखील काम करत असून, लवकरच एक मालवाहू तीन-चाकी ईव्ही बाजारात येणार आहे.

ऊर्जा क्षेत्रातील आव्हानं

समीर गुप्ता यांनी सांगितलं की, नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातही आव्हानं आहेत. जमिनीसंबंधी समस्या निर्माण होतात. पारेषण पायाभूत सुविधा मागणी पूर्ण करणं कठीण होतं. पण सरकारला या समस्यांची पूर्ण जाणीव असून तोडगा काढण्यासाठी सहकार्य करत आहेत. त्यात ऊर्जा साठवणूक ही एक मोठी समस्या आहे. सौर आणि पवन ऊर्जेची साठवणूक ही एक मोठी समस्या असून त्यावर काम सुरू आहे. दुसरीकडे, आपण लिथियमवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहोत. त्यामुळे या क्षेत्रातील संशोधन आणि विकासावर अधिक लक्ष केंद्रित करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावर लवकरच तोडगा काढू असंही त्यांनी सांगितलं.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.