अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल अचानक युद्धातला मोठा यु-टर्न घेतला. त्यांनी पुढच्या पाच दिवसांसाठी इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करणार नसल्याचं जाहीर केलय. इराणमध्ये ब्लॅकआऊटची धमकी देणारे ट्रम्प इतके अचानक कसे काय पलटले? हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे. इराण सोबत पडद्यामागे सकारात्मक चर्चा सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. पण इराणने मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात नेमकं काय आहे? अमेरिकेची पुढची रणनिती काय? हा अनेकांना प्रश्न पडला आहे. या सगळ्यामध्ये ट्रम्प यांच्या घोषणेच्या आधी जागतिक बाजारात ट्रेडिंगचा एक रहस्यमयी खेळ झाला. विश्लेषकांनुसार एका अज्ञात ट्रेडरने त्यावेळी 20 मिनिटात 100 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 840 कोटी रुपयांचा फायदा कमावला.


सोमवारीन्यू यॉर्क मधील वेळेनुसार, सकाळी 6.50 AM (भारतीय वेळेनुसार संध्याकाळचे 4:20 वाजता) सीएमई S&P 500 ई मिनी-फ्यूचर्समध्ये अचानक मोठ्या ट्रेडिंगची नोंद झाली. त्याचवेळी कच्चा तेलाच्या बाजारात सुद्धा घडामोडी घडल्या. ही वेळ खूप असामान्य होती. कारण प्री-मार्केट टाइम म्हणजे बाजार उघडण्याच्या आधीची वेळ सामान्यत: त्यावेळी इतकी लिक्विडिटी म्हणजे इतका मोठा देण्या-घेण्याचा व्यवहार होत नाही.


बरोबर 15 मिनिटांनी ट्रम्प यांची घोषणा


या ट्रेडिंगनंतर बरोबर 15 मिनिटांनी सकाळी 7:05 मिनिटांनी ट्रम्प यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर अमेरिकेची इराणसोबत चर्चा झाली आहे आणि पुढचे पाच दिवस इराणची वीज संयंत्र तसच ऊर्जेच्या पायाभूत सुविधांवर अमेरिका हल्ले करणार नाही असं जाहीर करण्यात आलं. पण ही घोषणा होण्याच्या काही मिनिटं आधी बाजारात अब्जावधी रुपयांचा व्यवहार झालेला होता.


1.5 अब्ज डॉलर फ्यूचर्सची खरेदी


ट्रेडिंग प्लॅटफॉर्म अनयूजुअल व्हेल्सनुसार या रहस्यमयी ट्रेडरने बाजारात दोन ठिकाणी एकाचवेळी पैज लावली. तणाव कमी झाल्याने शेअर बाजारात तेजी येईल या अपेक्षेने त्याने 1.5 अब्ज डॉलर म्हणजे (जवळपास 12,600 कोटी रुपये) फ्यूचर्स खरेदी केले.


किती फ्यूचर्स विकले?


युद्ध संपणार या अपेक्षेने कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण झाली. 192 मिलियन डॉलर (जवळपास 1,615) कोटी रुपये फ्यूचर्स विकून टाकले.


ट्रम्प यांच्या पोस्टनंतर तसचं झालं


एका मिनिटाच्या छोट्यावेळेत ब्रेंट आणि वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट जवळपास 6,200 फ्यूचर्स कॉन्ट्रॅक्टच्या देण्या-घेण्याचा व्यवहार झाला. याची किंमत 580 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 4,870 कोटी रुपये आहे. त्यावेळी ही किंमत सामान्य ट्रेड पेक्षा चार ते सहापट जास्त होती. ट्रम्प यांच्या पोस्टनंतर शेअर बाजार तसाच वागला, जशी ट्रेडिंग झाली होती.


इनसाइडर ट्रेडिंगची शक्यता


ओपनिंग बेल आधी S&P 500 फ्यूचर्समध्ये 2.5 टक्के उसळी दिसली.


ब्रेंट क्रूडची किंमत 109 डॉलरवरुन घसरुन 92 डॉलरवर आली.


WTI क्रूड मध्ये जवळपास 6 टक्के घसरण होऊन काहीवेळासाठी 88.70 डॉलर प्रति बॅरल झाली होती.


तेलाच्या किंमतीत झालेल्या या चढ-उतारात 20 मिनिटात 840 कोटी रुपयापेक्षा अधिकचा नफा कमावण्यात आला. यात इनसाइडर ट्रेडिंगची शक्यता आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.