• भुसावळच्या दिव्यांग कलाकार राशी पाटीलची प्रेरणादायी कथा


  • प्रा. उत्तम सुरवाडे यांनी शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली


  • स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मदतीचा हात



जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील दिव्यांग असूनही आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कला ,संगीत, अभिनय ,चित्रकला ,या क्षेत्रात सर्वांना अचंबित करणारी करणारी. राशी पाटील हिचे पालकत्व स्वीकारून शिक्षणाची जबाबदारी समन्वयक प्रा उत्तम सुरवाडे यांनी " मुके आंधळे अपंग बालक!समाज व्हावा त्यांचा पालक! या भावनेतून सिने अभिनेत्री भावना गायकवाड साक्षीने सहकार्याने भाग्यवेद अकॅडमीच्या एका कार्यक्रमात प्रसंगी. स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून घेतली.

Mukhyamantri Rajshree Yojana: मुलींच्या जन्मापासून मिळणार ₹५०,०००; काय आहे सरकारची योजना, कोणाला मिळणार लाभ?

याप्रसंगी नगराध्यक्ष सुनील काळे जिल्हाप्रमुख समाधान राजेंद्र चौधरी राजेश्वरी निळे नारायण निळे नाशिकेत नेमाडे राशीचे वडील प्रवीण पाटील आई निशा पाटील आदी उपस्थित होते. राशीला अपंगत्व आलं कसं? कहानी मनाला सुन्न करणारी आहे. अवघ्या तीन वर्षाची असताना डॉक्टरांच्या केवळ चुकीच्या ट्रीटमेंट दिल्या गेल्यामुळे आयुष्यच पार बदलून गेलं. होत्याचं नव्हतं झालं.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार? एकाचवेळी ३००० येणार? महत्त्वाची तारीख आली समोर

कायमचं अपंगत्वआलं. घडलं ते नॉट फेअर ... वाट्याला आली आयुष्यभर व्हीलचेअर! तिचे आता हातपाय काम करत नाही. म्हणून ओठांनी मोबाईल ऑपरेट जिभेने लॅपटॉप ऑपरेट करते. जीभेने पियानो वाजवते. तोंडात कुंचला (ब्रश)पकडून अप्रतिम चित्र साकारते तिने साकारलेल्या अनेक चित्रांना पारितोषिक, मान्यवरांचे दाद मिळाली आहे. तिने शिकत असलेल्या सप्त ललित कला भवन मध्ये जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावलाय.


अवघ्या वयाच्या 18 व्या वर्षी तिला "खान्देश आयकॉन आणि तेजस्विनी" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकलाप्रेमी छायाचित्रकार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून त्यांना त्यांची छायाचित्र भेट देण्याची इच्छा तिने बोलून दाखवली. आहे.या मोठ्या मंडळींना वेळेची कमतरता असल्यामुळे उत्सुकता आहे. त् नियती कधी ती भेट घडून आणते याची?

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.