राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज विधानपरिषदेच्या ९ आमदारांचा निरोप समारंभ झाला. यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेंचा स्वभाव राजकारणी नाही. तर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे साहेब असा उल्लेख केला. यानंतर निरोपाचं भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी सर्व मंत्री महोदय, सहकारी आणि अधिकाऱ्यांचे आभार मानले. आभार मानताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत अनेकांचा उल्लेख केला. तसंच देशातील एलपीजी सिलिंडरचा तुटवडा ते अशोक खरात प्रकरण यावरूनही टीका केली. Thackeray Targets Top Leaders in Speech Mentions LPG Crisis and Political Issues
सहकारी आणि अधिकाऱ्यांचे आभारप्रशासनाचा गंधही नसलेला माणूस अचानक राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर बसतो. तो राज्य चालवतो. ते या सगळ्यांच्या सहकाऱ्याशिवाय शक्य झालं नसतं. माझ्या निरोपासठी मुख्यमंत्री महोदय हजार राहिलात त्याबद्दल धन्यवाद. मंत्रिमंडळात होते ते आणि सरकारी अधिकारी, सर्व प्रशासन आणि खात्याच्या अधिकाऱ्यांचेही उद्धव ठाकरे यांनी आभार मानले.
कोण आहे अशोक खरात? ८वी पास, घरातून पैसे घेऊन पळाला; २००३ला आमदाराने वाचवलं नसतं तर... रेडे कापले जातायत - ठाकरेमुख्यमंत्री फडणवीसांनी सभागृहात संत ज्ञानेश्वरांचं भारूड म्हटलं होतं. त्याची आठवण करून देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, संत ज्ञानेश्वर १२ व्या शतकात होऊन गेले. तेव्हा रेड्याकडून वेद वदवून घेतले. आता स्वार्थासाठी रेडे कापले जातायत. महाराष्ट्र कोणत्या दिशेने जातोय? पण तरीही नाशिकबाबत तुम्ही जी भूमिका घेतली त्याबद्दल धन्यवाद.
पंतप्रधान मोदी, कोरोना अन् सिलिंडरउद्धव ठाकरे म्हणाले की, योगायोग म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्याच दिवशी ६ वर्षांपूर्वी लॉकडाऊन लागू केला. माझं काम सुरू झालं त्या दिवशी. आज मी सभागृहाचा निरोप घेतोय. तो कालखंड खूप विचित्र होता. सहा वर्षांपूर्वी ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता होती, आज गॅस सिलिंडरची कमतरता आहे. कोरोनाकाळात आपण जे काम केलं त्याचं कौतुक झालं नाही. गंगेत शव वाहत होते, युपीत चिता पेटल्या होत्या. पण महाराष्ट्रात इतकं घडलं नाही. आपण आकडा लपवला नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
Ashok Kharat मी पहिल्यांदाच हे ऐकतोय! खरात कोर्टात काय बोलला? मंदिरातही कधीतरी जायचो, तिथे... पक्षांतर, फोडाफोडीच्या राजकारणावर टीकापक्षांतर, फोडाफोडीच्या राजकारणावरही उद्धव ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले की आपल्या देशातील राजकारण इंडियन पॉलिटिकल लीग आहे. आता परिस्थिती अशी आहे की सगळेच खेळाडू आपल्या संघात घेतले तर मॅच कुणासोबत खेळणार? आपल्यासाठी हे काहीतरी करू शकतात हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण व्हावा, ज्यांना हा विश्वास निर्माण करण्याची संधी मिळाली त्यांनी त्याचं सोनं करावं. आपण प्रवासोबत रहायचं की ठामपणे थांबून प्रवाह बदलायचा ठरवावं. लाटेसोबत वाहत जाणाऱ्यांसाठी विंदांची कविता आहे. "ही लाट आहे तोवरी खुशाल तू गाजून घे, गाजण्याला अर्थ कितीसा? हे जरा समजून घे या ओळी ठाकरेंनी म्हणून दाखवल्या.
ठाकरे कोट्याधीश - फडणवीसआम्ही सहप्रवासी राहिलो आहोत. ते उत्तम छायाचित्रकार आहेत. त्यांनी छायाचित्रण नाही तर संस्कृती जपण्याचं काम केलंय. आमच्यात मैत्रीची भावना आहे पण राजकीय भूमिका वेगळ्या झाल्या आहेत. सामान्य माणसालाही राजकीय चेहरा देण्याचा गुण त्यांनी जपला. पुल यांच्यानंतर शब्दांचे कोट्याधीश ही पदवी ठाकरेंनाच द्यावी लागेल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकमेकांवर टीकेची एकही संधी उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सोडली नाही. सभागृहात निरोपाच्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करताना साहेब म्हटलं. उद्धव ठाकरे साहेब निरोप घेतायत त्यांना निरोगी आयुष्य लाभो, राजकीय आयुष्याला शुभेच्छा अशा शब्दात शिंदेंनी शुभेच्छा दिल्या.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.